God
God चा उल्लेख असलेली वचने
तेव्हा सादोकाचा पुत्र अहीमाज म्हणाला, “मी धावत जाऊन राजाला ही बातमी द्यावी, की याहवेहने राजाला त्यांच्या शत्रूच्या हातून सोडवून मुक्ती दिली आहे.”
तेव्हा अहीमाजने राजाला आवाज देत म्हटले, “सर्वकाही ठीक आहे!” त्याने आपले मुख जमिनीपर्यंत खाली लववून म्हटले, “याहवेह, आपला परमेश्वर धन्यवादित असो! माझ्या धनीराजाविरुद्ध हात उचलणार्यांना याहवेहने आपल्या हाती घेतले आहे.”
नंतर कूशी मनुष्य येऊन पोहोचला आणि म्हणाला, “माझे राजा, माझे स्वामी, चांगली बातमी ऐका! आपल्याविरुद्ध उठलेल्या लोकांच्या हातातून याहवेहने तुम्हाला सोडवून तुमची सुटका केली आहे.”
तेव्हा राजा हादरून गेला. तो वरती दरवाज्यावरील खोलीत गेला आणि रडला! “माझ्या मुला, माझ्या मुला अबशालोमा! तुझ्या ऐवजी मी मेलो असतो—अरे माझ्या पुत्रा अबशालोमा, माझ्या पुत्रा!”
तर आता बाहेर जा आणि तुमच्या माणसांना उत्तेजित करा. मी जिवंत याहवेहची शपथ घेऊन सांगतो की, तुम्ही बाहेर गेला नाही, तर आज रात्र येईपर्यंत तुमच्याजवळ एकही मनुष्य असणार नाही. तुमच्या तारुण्यापासून आजपर्यंत जी सर्व अरिष्टे तुमच्यावर आली त्यापेक्षा हे तुमच्यासाठी अधिक वाईट असे होईल.”
आणि अमासाला असे म्हणा, ‘तू माझ्या हाडामांसाचा नाहीस काय? योआबाच्या जागी तू माझ्या सैन्याचा सेनापती झाला नाहीस तर परमेश्वर मला अधिक कठोर शिक्षा करो.’ ”
तेव्हा जेरुइयाहचा पुत्र अबीशाई म्हणाला, “शिमीने याहवेहच्या अभिषिक्ताला शाप दिला यामुळे शिमीला जिवे मारावे की नाही?”
परंतु त्याने आपल्या सेवकाविषयी माझ्या स्वामीला खोटे सांगितले. माझे स्वामी तर परमेश्वराच्या दूताप्रमाणे आहेत; म्हणून आपणास जे योग्य वाटेल ते आपण करावे.
आम्ही शांतताप्रिय आणि इस्राएलचे विश्वासू लोक आहोत. तुम्ही इस्राएलातील मातृनगराचा नाश करण्याचा प्रयत्न का करीत आहात? याहवेहच्या वतनाचा तुम्ही का नाश करावा?”
दावीदाच्या कारकिर्दीत लागोपाठ तीन वर्षे दुष्काळ पडला होता; म्हणून दावीद याहवेहसमोर गेला. याहवेह म्हणाले, “हे शौल आणि त्याच्या रक्तदोषी घराण्यामुळे आहे; कारण त्याने गिबोनी लोकांना मारले होते.”
दावीदाने गिबोनी लोकांना विचारले, “मी तुमच्यासाठी काय करावे? कशाप्रकारे मी प्रायश्चित करावे की तुम्ही याहवेहच्या वतनाला आशीर्वाद द्याल?”
तर आता त्याच्या वंशातील सात पुरुषांना आमच्याकडे द्यावे म्हणजे शौल जो याहवेहद्वारे निवडला गेला होता, त्याच्या गिबियाहमध्ये आम्ही त्यांना मारून टाकून त्यांची शरीर तिथे उघडे टाकू.” तेव्हा राजा म्हणाला, “मी त्यांना तुमच्या हाती देईन.”
शौलाचा पुत्र योनाथान व दावीदामध्ये याहवेहसमोर झालेल्या शपथेमुळे राजाने शौलाचा पुत्र योनाथान याचा पुत्र मेफीबोशेथ याची गय केली.
त्याने त्यांना गिबोनी लोकांच्या हाती सोपवून दिले, ज्यांनी त्यांना मारून टाकले आणि त्यांची शरीरे डोंगरावर याहवेहसमोर प्रदर्शित केली. ते सातही जण एकत्र मरण पावले; हंगामाच्या सुरवातीच्या दिवसांमध्ये त्यांना मारण्यात आले होते, जेव्हा जवाच्या हंगामाची सुरुवात झाली होती.
त्यांनी बिन्यामीन प्रांतातील सेला येथे शौल व त्याचा पुत्र योनाथान यांच्या अस्थी, शौलाचा पिता कीश याच्या कबरेत पुरल्या आणि राजाने आज्ञापिल्याप्रमाणे सर्वकाही केले, त्यानंतर देशाच्या वतीने केलेल्या प्रार्थनेचे परमेश्वराने उत्तर दिले.
जेव्हा याहवेहने दावीदाला त्याच्या सर्व शत्रूंच्या हातातून आणि शौलाच्या हातातून सोडविले, तेव्हा दावीदाने या शब्दात याहवेहसाठी गीत गाईले.
तो म्हणाला: “याहवेह माझे खडक, माझे दुर्ग आणि मला सोडविणारे आहेत;
माझे परमेश्वर माझे खडक आहेत, ज्यांच्या ठायी मी आश्रय घेतो, तेच माझी ढाल आणि माझ्या तारणाचे शिंग आहे. ते माझे गड, माझे शरणस्थान आणि माझे तारणारे आहेत; हिंसक लोकांपासून याहवेह, तुम्ही मला वाचवितात.
“स्तुतीस योग्य याहवेहचा, मी धावा केला, आणि माझ्या शत्रूपासून माझी सुटका झाली.
“मी आपल्या संकटात याहवेहचा धावा केला; मी माझ्या परमेश्वराचा धावा केला. आणि त्यांनी आपल्या मंदिरातून माझी आरोळी ऐकली; माझा धावा त्यांच्या कानी पडला.
तेव्हा पृथ्वी हादरली व कंपित झाली, आकाशाचे पाये हादरले; याहवेहच्या क्रोधामुळे ते भयभीत झाले.
त्यांच्या नाकपुड्यातून धूर निघाला; भस्म करणारा अग्नी त्यांच्या मुखातून निघाला, जळते निखारे त्यातून निघाले.
आकाशाला विभागून याहवेह खाली आले; घनदाट ढग त्यांच्या पायाखाली होते.
करुबावर आरूढ होऊन ते उडून गेले; वार्याच्या पंखांवर त्यांनी भरारी मारली.
अंधकार, व आकाशातील काळे मेघ; यांचा त्यांनी आपल्या सभोवती मंडप केला आहे.