- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
येशू पक्षघातीला क्षमा करून बरे करतो
मत्तय ९:१-८
येशू पक्षघातीला क्षमा करून बरे करतो
१
येशू एका होडीत चढले आणि सरोवराच्या पलीकडे आपल्या शहरात आले.
२
काही लोकांनी एका पक्षघाती मनुष्याला, खाटेवर ठेऊन त्यांच्याकडे आणले. जेव्हा येशूने त्यांचा विश्वास पाहिला, त्या मनुष्याला म्हणाले, “मुला, धीर धर, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.”
३
तेव्हा तिथे उपस्थित असलेले काही नियमशास्त्र शिक्षक आपसात म्हणू लागले, “हा मनुष्य दुर्भाषण करतो!”
४
त्यांचे विचार येशूंनी ओळखून त्यांना विचारले, “तुम्ही तुमच्या मनामध्ये दुष्टाईने भरलेले विचार का करता?
५
यातून कोणते म्हणणे सोपे आहे, ‘तुझ्या पापांची क्षमा झाली आहे,’ किंवा ‘ऊठ आपली बाज उचलून चालू लाग?’
६
तुम्हाला हे समजण्याची गरज आहे की मानवपुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे.” ते पक्षघाती मनुष्याला म्हणाले, “ऊठ, आपले अंथरूण उचल आणि घरी जा.”
७
तेव्हा तो मनुष्य उठला आणि आपल्या घरी गेला.
८
प्रत्यक्ष घडलेला हा चमत्कार पाहून जमावाला भीती वाटली व ज्यांनी मनुष्यास असा अधिकार दिला त्या परमेश्वराची त्या सर्वांनी स्तुती केली.
उताऱ्याचा अभ्यास
एका वचनावर नसून संपूर्ण उताऱ्यावर आधारित भाष्य.
- कोण
- कोठे
- केव्हा
- About
शास्त्रात हे आणखी कोठे सांगितले आहे.
योहान ५:८
तेव्हा येशू त्याला म्हणाले, “ऊठ आणि आपले अंथरूण उचल आणि चालू लाग.”वचन ५ मधूनयोहान ५:१४
नंतर येशूंना तो मनुष्य मंदिरात आढळला आणि येशूंनी त्याला सांगितले, “पाहा, तू आता बरा झाला आहेस. येथून पुढे पाप करू नकोस, नाही तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल.”वचन ५ मधूनमार्क २:१२
तो मनुष्य उठला आणि लगेच अंथरूण उचलून त्या सर्वांसमोर चालत गेला. तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटले व सर्वांनी परमेश्वराची स्तुती केली. ते म्हणाले, “आम्ही असे काही कधीही पाहिले नाही!”वचन २ मधूनमार्क २:९
या पक्षघाती मनुष्याला ‘तुझ्या पापांची क्षमा झाली आहे,’ किंवा ‘ऊठ आपले अंथरूण उचलून घे व चालू लाग’? यातून काय म्हणणे सोपे आहे.वचन ५ मधूनप्रेषित ३:१६
येशूंच्या नावावरील विश्वासामुळे हा मनुष्य ज्याला आपण पाहता व ओळखता तो आता बलवान झाला आहे. येशूंच्या नावावरील विश्वासाद्वारे तो पूर्ण बरा झालेला आहे, हे तुम्ही सर्वजण पाहतच आहात.वचन ५ मधूनलूक ५:२३
यातून कोणते म्हणणे सोपे आहे ‘तुझ्या पापांची क्षमा झाली आहे,’ किंवा ‘ऊठ आपली बाज उचलून चालू लाग?’वचन ५ मधूनलूक ५:२५
त्याचवेळी तो त्यांच्यासमोर उभा राहिला आणि ज्या बिछान्यावर तो झोपत असे, ते घेऊन परमेश्वराची स्तुती करीत घरी गेला.वचन ५ मधूनप्रेषित १४:८
त्यांना लुस्त्र मध्ये पांगळा मनुष्य बसलेला आढळला. तो जन्मापासूनच पांगळा असून कधीही चालू शकला नव्हता.वचन ५ मधूनप्रेषित १४:११
पौलाने केलेले कृत्य पाहून जमाव लुकवनी भाषेत मोठ्याने ओरडून म्हणाला, “परमेश्वर आमच्यामध्ये मनुष्य रूपाने उतरून आले आहेत!”वचन ५ मधूनप्रेषित ३:६
परंतु पेत्र त्याला म्हणाला, “माझ्याजवळ चांदी किंवा सोने नाही, परंतु जे आहे ते तुला देतो. नासरेथकर येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग.”वचन ५ मधूनप्रेषित ३:११
मग तो पेत्र व योहान यांना बिलगून राहिला असता, सर्व लोक फार आश्चर्यचकित होऊन शलोमोनाच्या देवडीकडे धावत आले.वचन ५ मधूनयशायाह ३५:५
तेव्हा आंधळ्यांचे डोळे उघडतील आणि बहिऱ्यांचे कान उघडले जातील.वचन ५ मधून



अभ्यास टीप
Settings