Skip to content
मार्क १०:४६-५२

आंधळ्या बर्तिमयाला बरे करणे

मार्क १०:४६-५२

आंधळ्या बर्तिमयाला बरे करणे

४६
मग येशू यरीहो शहरात आले. तिथे येशू आणि त्यांचे शिष्य, मोठ्या समुदायासह शहर सोडून जात असताना, तीमयाचा पुत्र बार्तीमय हा आंधळा, येशू ज्या रस्त्याने चालले होते, त्या रस्त्याच्या कडेला भीक मागत बसला होता.
४७
जेव्हा हे नासरेथकर येशू जात आहेत असे त्याने ऐकले, तेव्हा तो मोठ्याने ओरडू लागला, “अहो येशू, दावीदाचे पुत्र, माझ्यावर दया करा!”
४८
अनेकांनी त्याला धमकाविले आणि गप्प बसण्यास सांगितले, पण तो अधिकच मोठमोठ्याने ओरडून म्हणू लागला, “अहो, दावीदाचे पुत्र, माझ्यावर दया करा!”
४९
येशू थांबले आणि म्हणाले, “त्याला इकडे बोलवा.” त्याप्रमाणे लोक त्या आंधळ्या मनुष्याला म्हणाले, “धीर धर, आपल्या पायांवर उभा राहा, ते तुला बोलावत आहेत.”
५०
हे ऐकताच बार्तीमयने आपला अंगरखा भिरकावून दिला, उडी मारून तो उठला आणि येशूंकडे आला.
५१
“मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे?” येशूंनी त्याला विचारले. आंधळा मनुष्य म्हणाला, “गुरुजी मला दृष्टी यावी.”
५२
येशू म्हणाले, “जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.” त्याच क्षणाला त्याला दिसू लागले आणि तो रस्त्याने येशूंच्या मागे चालू लागला.

हे देखील पहा

शास्त्रात हे आणखी कोठे सांगितले आहे.

  • लूक १८:३५

    येशू यरीहो शहराजवळ आले, तेव्हा एक आंधळा भिकारी, रस्त्याच्या कडेला भीक मागत बसला होता.
    वचन ४६ मधून
  • लूक १९:१

    येशू यरीहोत प्रवेश करून त्यातून जात होते,
    वचन ४६ मधून
  • मत्तय २०:२९

    येशू व त्यांचे शिष्य हे यरीहो शहर सोडून जात असताना, त्यांच्यामागे खूप मोठी गर्दी चालली होती.
    वचन ४६ मधून
  • मत्तय २०:३४

    येशूंना त्यांचा कळवळा आला; त्यांनी त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला; ताबडतोब त्यांना दिसू लागले आणि ते त्यांच्यामागे चालू लागले.
    वचन ४६ मधून
  • लूक १८:४१

    “मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे?” “प्रभू मला दृष्टी यावी.” त्याने उत्तर दिले.
    वचन ५१ मधून
  • लूक १८:४३

    त्याच क्षणाला त्याला दिसू लागले आणि परमेश्वराची स्तुती करीत तो येशूंच्या मागे चालू लागला. जेव्हा सर्व लोकांनी हे पाहिले, त्यांनी सुद्धा परमेश्वराची स्तुती केली.
    वचन ५१ मधून
  • 2 इतिहास १:७

    त्या रात्री परमेश्वर शलोमोनला दर्शन देऊन म्हणाले, “मी तुला जे काही द्यावे असे तुला वाटते ते माग.”
    वचन ५१ मधून
  • मार्क १०:३६

    “मी तुमच्यासाठी काय करावे, अशी तुमची इच्छा आहे?” येशूंनी विचारले.
    वचन ५१ मधून
  • मत्तय ७:७

    “मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, दार ठोका म्हणजे ते उघडले जाईल.
    वचन ५१ मधून
  • योहान ९:८

    त्याचे शेजारी आणि इतर लोक त्याला एक भिकारी म्हणून ओळखत होते, ते एकमेकांना विचारू लागले “बसून भीक मागणारा तो हाच मनुष्य नाही काय?”
    वचन ४६ मधून
  • फिलिप्पैकरांस ४:६

    कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व परिस्थितीत, प्रार्थना व विनवणी करीत, उपकारस्तुतीसह आपल्या मागण्या परमेश्वराला कळवा.
    वचन ५१ मधून
  • मत्तय ९:२२

    येशू मागे वळून तिला म्हणाले, “मुली, धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे” आणि त्याच क्षणी ती स्त्री बरी झाली.
    वचन ५२ मधून

हे कोठे घडते

All Mark Sites (Jerusalem)
All Mark Sites (Jerusalem) View full PDF
Jesus' Final Return to Jerusalem in the Synoptic Gospels
Jesus' Final Return to Jerusalem in the Synoptic Gospels View full PDF
Mark 10:46-51
Mark 10:46-51 View full PDF

Map © Biblica Open Bible Maps · CC BY-SA 4.0

Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options