Skip to content
यहोशुआ १८:१२-२८

यहोशुआ १८:१२-२८

१२
उत्तरेकडील सीमा यार्देन नदीजवळ सुरू होऊन ती यरीहोच्या उत्तरेच्या उतरणीस जाऊन नंतर पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेशातून व बेथ-आवेनच्या रानातून गेलेली होती.
१३
तिथून ती सीमा ज्याला बेथेल देखील म्हणत, त्या लूज शहराच्या दक्षिणेकडे जाऊन पुढे खालच्या बेथ-होरोनाच्या दक्षिणेस असलेल्या डोंगराळ प्रदेशातील अटारोथ-अद्दार पर्यंत गेली.
१४
तिथून ती सीमा दक्षिणेकडे वळून बेथ-होरोनजवळील डोंगरावरून किर्याथ-बआल (म्हणजे किर्याथ-यआरीम) मध्ये येते. यहूदीयाच्या लोकांच्या नगरांपैकी ते एक होते. ही पश्चिमी सीमा होती.
१५
दक्षिणेकडील सीमा किर्याथ-बआल (म्हणजे किर्याथ-यआरीम) नगराच्या बाहेरील बाजूपासून सुरू झाली व ती नेफतोआहच्या झर्‍याकडे पोहोचली.
१६
तिथून ती खाली रेफाईम खोर्‍याच्या उत्तरेस असलेल्या हिन्नोम खोर्‍याच्या जवळील डोंगराच्या पायथ्याशी जाऊन पुढे हिन्नोम खोरे ओलांडून यबूसी लोक राहत त्या यरुशलेम शहराच्या दक्षिण बाजूने एन-रोगेल येथे गेली.
१७
मग ती सीमा उत्तरेस वळून एन-शेमेशकडे जाऊन पुढे गलीलोथ जे अदुमिम्माच्या उतरणीच्या समोर होते तिथे गेली. नंतर तिथून ती खाली रऊबेनाचा पुत्र बोहन याच्या खडकाकडे जाते.
१८
ती सीमा पुढे बेथ-अराबाहच्या उत्तरेकडील उताराकडून खाली अराबाकडे गेली होती.
१९
पुढे ती सीमा बेथ-होगलाहच्या उत्तरेकडील उताराला जाऊन मृत समुद्राच्या उत्तरेच्या खाडीजवळ येते. ही यार्देन नदीच्या मुखाजवळील दक्षिण सीमा आहे.
२०
पूर्वेकडील सीमा यार्देन नदी होती.
२१
बिन्यामीन गोत्राच्या कुळानुसार मिळालेली नगरे ही होती: यरीहो, बेथ-होगलाह, एमेक-केझीज,
२२
बेथ-अराबाह, सेमाराईम, बेथेल,
२३
अव्वीम, पाराह, ओफराह,
२४
कफर-अम्मोनी, ओफनी आणि गेबा; ही बारा नगरे आणि त्यांची गावे.
२५
गिबोन, रामाह, बैरोथ,
२६
मिस्पेह, कफीराह, मोजाह,
२७
रेकेम, यिरपएल, तरलाह,
२८
सेला हाएलेफ, यबूसी शहर (म्हणजेच यरुशलेम), गिबियाह आणि किर्याथ; ही चौदा नगरे आणि त्यांची गावे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options