Skip to content
योहान १९:३१-३७

भाला भोसकणे व शास्त्रलेखाची पूर्तता

योहान १९:३१-३७

भाला भोसकणे व शास्त्रलेखाची पूर्तता

३१
आता क्रूसावर खिळलेल्यांची शरीरे दुसर्‍या दिवसापर्यंत लटकत राहू नयेत, अशी यहूदी पुढार्‍यांची इच्छा होती. कारण हा तयारीचा दिवस होता आणि दुसरा दिवस हा एक विशेष शब्बाथ होता. म्हणून त्यांचे पाय मोडण्याचा हुकूम द्यावा, अशी विनंती त्यांनी पिलाताला केली, मग त्यांची शरीरे उतरवून घेता येतील.
३२
त्याप्रमाणे सैनिकांनी येशूंबरोबर क्रूसावर टांगलेल्या पहिल्याचे पाय मोडले मग दुसर्‍याचे ही मोडले.
३३
परंतु जेव्हा ते येशूंजवळ आले, तेव्हा ते आधीच मरण पावल्याचे त्यांना दिसून आले, म्हणून त्यांनी येशूंचे पाय मोडले नाहीत.
३४
तरीपण, सैनिकांपैकी एकाने त्यांच्या कुशीत भाला भोसकला, तेव्हा रक्त व पाण्याचा ओघ बाहेर पडला.
३५
ज्या मनुष्याने हे पाहिले त्याने साक्ष दिली आणि त्याची साक्ष खरी आहे. त्याला माहीत आहे की तो सत्य बोलत आहे आणि तो साक्ष देतो यासाठी की, तुम्हीही विश्वास ठेवावा.
३६
सैनिकांनी जे केले त्यामुळे पुढील शास्त्रलेख पूर्ण झाले: “त्याच्या हाडांपैकी एकही हाड मोडले जाणार नाही,”
३७
आणि आणखी एक शास्त्रलेख असा आहे, “ज्याला त्यांनी भोसकले ते त्याच्याकडे पाहतील.”

उताऱ्याचा अभ्यास

एका वचनावर नसून संपूर्ण उताऱ्यावर आधारित भाष्य.

शास्त्रात हे आणखी कोठे सांगितले आहे.

  • स्तोत्रसंहिता ३४:२०

    ते त्याच्या प्रत्येक हाडांचे रक्षण करतात, त्यातील एकही मोडणार नाही.
    वचन ३६ मधून
  • जखऱ्याह १२:१०

    “मग मी दावीदाच्या घराण्यावर व यरुशलेमच्या सर्व रहिवाशांवर कृपेचा आणि विनंतीचा आत्मा ओतेन आणि ज्याला त्यांनी भोसकले त्या माझ्याकडे ते पाहतील आणि एकुलत्या एका पुत्रासाठी करावा, तसा ते त्याच्यासाठी शोक करतील आणि प्रथम पुत्रासाठी करावा, तसा ते त्याच्यासाठी विलाप करतील.
    वचन ३४ मधून
  • गणना ९:१२

    त्यांनी दुसर्‍या दिवसाच्या सकाळपर्यंत त्यातील काहीही शिल्लक ठेवू नये किंवा त्याचे एकही हाड मोडू नये. जेव्हा ते वल्हांडण पाळतात, तेव्हा त्यांनी सर्व नियम पाळावेत.
    वचन ३६ मधून
  • प्रकटीकरण १:७

    “पाहा, ते मेघारूढ होऊन येत आहेत,” आणि “प्रत्येक नेत्र त्यांना पाहील, स्वतः त्याला भोसकणारेही त्यांच्याकडे पाहतील” आणि तेव्हा पृथ्वीवरील सर्व लोक “त्यांच्यामुळे शोक करतील.”
    वचन ३७ मधून
  • स्तोत्रसंहिता २२:१६

    मला कुत्र्यांनी वेढले आहे, दुष्कर्म्यांची टोळी मला घेरून आहे; त्यांनी माझ्या हातापायाला विंधले आहे.
    वचन ३७ मधून
  • स्तोत्रसंहिता २२:१७

    माझ्या शरीरातील हाडे मी मोजू शकतो, हे लोक माझ्याकडे कसे टक लावून पाहत आहेत.
    वचन ३७ मधून
  • निर्गम १२:४६

    “ते घरातच खावयाचे आहे; त्यातील मांस घराबाहेर घेऊन जाऊ नये. त्यातील एकही हाड मोडू नये.
    वचन ३६ मधून
  • योहान १९:१४

    तो वल्हांडणाच्या तयारीचा दिवस असून; ती दुपारची वेळ होती. “हा पाहा तुमचा राजा,” पिलात यहूदीयांना म्हणाला.
    वचन ३१ मधून
  • 1 योहान ५:६

    पाणी आणि रक्त यांच्याद्वारे जे आले तेच येशू ख्रिस्त आहेत. ते केवळ पाण्याच्याद्वारे आले नाहीत, परंतु पाण्याच्या आणि रक्ताच्याद्वारे आले. जो साक्ष देतो तो परमेश्वराचा आत्मा आहे, कारण आत्मा सत्य आहे.
    वचन ३४ मधून
  • योहान १९:४२

    शब्बाथ सुरू होण्यापूर्वी सर्वकाही उरकण्याची घाई होती व ही कबर जवळच होती, म्हणून त्यांनी येशूंचे शरीर त्याच कबरेत ठेवले.
    वचन ३१ मधून
  • 1 योहान ५:८

    आत्मा, पाणी आणि रक्त या तिघांमध्ये एकमत आहे.
    वचन ३४ मधून
  • जखऱ्याह १३:१

    “त्या दिवशी दावीदाच्या घराण्यातून आणि यरुशलेममधील लोकांमधून एक झरा उगम पावेल, तो त्याच्या लोकांना सर्व पापांपासून आणि अशुद्धतेपासून शुद्ध करेल.
    वचन ३४ मधून
All John Sites (Jerusalem)
All John Sites (Jerusalem) View full PDF
All John Sites (Levant)
All John Sites (Levant) View full PDF
The Last Week of Jesus' Life (With Reference Table)
The Last Week of Jesus' Life (With Reference Table) View full PDF

Map © Biblica Open Bible Maps · CC BY-SA 4.0

Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options