Skip to content
योहान १९:१९-२२

योहान १९:१९-२२

१९
पिलाताने त्यांच्या क्रूसावर एक लेखपत्रक लावले, ते असे होते: यहूद्यांचा राजा, नासरेथकर येशू.
२०
अनेक यहूद्यांनी हे पत्रक वाचले, कारण येशूंना ज्या ठिकाणी क्रूसावर खिळले होते ते ठिकाण शहराच्या जवळ होते आणि क्रूसावरील लेख हा हिब्रू, लॅटिन व ग्रीक भाषांमध्ये लिहिलेला होता.
२१
मुख्य याजक पिलाताला म्हणाले, “यहूद्यांचा राजा असे लिहू नका” तर “मी यहूद्यांचा राजा आहे, असे या मनुष्याने म्हटले होते तसे लिहा.”
२२
तेव्हा पिलाताने उत्तर दिले, “मी जे लिहिले, ते लिहिले.”

उताऱ्याचा अभ्यास

एका वचनावर नसून संपूर्ण उताऱ्यावर आधारित भाष्य.

शास्त्रात हे आणखी कोठे सांगितले आहे.

  • मत्तय २७:३७

    त्यांच्या डोक्याच्या वरच्या बाजूला दोषपत्राचा लेख लावण्यात आला होता, त्यावर लिहिले होते: हा येशू, यहूद्यांचा राजा आहे.
    वचन १९ मधून
  • लूक २३:३८

    त्यांच्या डोक्याच्या वर एक लेखपत्रक लावण्यात आले. त्यावर लिहिले होते: हा यहूद्यांचा राजा आहे.
    वचन १९ मधून
  • मार्क १५:२६

    एक दोषपत्राचा लेख वर लावण्यात आला होता: यहूद्यांचा राजा.
    वचन १९ मधून
  • योहान १९:१४

    तो वल्हांडणाच्या तयारीचा दिवस असून; ती दुपारची वेळ होती. “हा पाहा तुमचा राजा,” पिलात यहूदीयांना म्हणाला.
    वचन १९ मधून
  • प्रेषित ३:६

    परंतु पेत्र त्याला म्हणाला, “माझ्याजवळ चांदी किंवा सोने नाही, परंतु जे आहे ते तुला देतो. नासरेथकर येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग.”
    वचन १९ मधून
  • योहान १:४५

    मग फिलिप्पाला नाथानाएल सापडल्यानंतर तो त्याला म्हणाला, “ज्यांच्याबद्दल मोशेने नियमशास्त्रात लिहून ठेवले आणि ज्यांच्याबद्दल संदेष्ट्यांनीसुद्धा कथन केले ते, येशू नासरेथकर, योसेफाचे पुत्र आम्हाला सापडले आहेत.”
    वचन १९ मधून
  • योहान १:४६

    त्यावर नाथानाएलाने विचारले, “नासरेथ! तिथून काही चांगले निघू शकेल काय?” यावर फिलिप्पाने त्याला म्हटले, “तू ये आणि पाहा.”
    वचन १९ मधून
  • योहान १:४९

    नाथानाएलाने जाहीर केले, “गुरुजी, आपण परमेश्वराचे पुत्र; आपण इस्राएलचे राजे आहात.”
    वचन १९ मधून
  • योहान १८:३३

    मग पिलात राजवाड्यामध्ये परतला आणि त्याने येशूंना आपल्यापुढे बोलावून विचारले, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?”
    वचन १९ मधून
  • योहान १९:३

    ते त्यांच्याकडे वारंवार जाऊन म्हणाले, “यहूद्यांचा राजा, तुझा जयजयकार असो!” आणि त्यांनी त्याच्या तोंडावर चापटा मारल्या.
    वचन १९ मधून
  • योहान १९:१२

    तेव्हापासून, पिलात येशूंना मुक्त करण्याचा प्रयत्न करू लागला, परंतु यहूदी पुढारी ओरडत राहिले, “तुम्ही या मनुष्याला सोडले, तर तुम्ही कैसराचे मित्र नाही; कारण जो कोणी स्वतःला राजा म्हणवितो तो कैसराचा विरोधी आहे.”
    वचन १९ मधून
  • योहान १९:२१

    मुख्य याजक पिलाताला म्हणाले, “यहूद्यांचा राजा असे लिहू नका” तर “मी यहूद्यांचा राजा आहे, असे या मनुष्याने म्हटले होते तसे लिहा.”
    वचन १९ मधून
All John Sites (Jerusalem)
All John Sites (Jerusalem) View full PDF
John 19:17-29
John 19:17-29 View full PDF
John 7:37-44, John 19:17-29
John 7:37-44, John 19:17-29 View full PDF

Map © Biblica Open Bible Maps · CC BY-SA 4.0

Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options