- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
उजाड करणारी अमंगळ वस्तू
दानीएल ११:३१-३५
उजाड करणारी अमंगळ वस्तू
३१
“त्याचे सशस्त्र सैन्य मंदिराच्या दुर्गास अपवित्र करण्यासाठी पुढे येतील आणि दैनंदिन होमार्पण बंद केले जाईल. मग ते ओसाड करणारा अमंगळ पदार्थ स्थापतील.
३२
जे कराराविरुद्ध दुष्टता करतात, त्यांना तो खुशामत करून भ्रष्ट करेल, पण ज्यांना त्यांचा परमेश्वर माहीत आहे ते त्याला खात्रीने सामोरे जातील.
३३
“जे ज्ञानी आहेत ते पुष्कळांना शिक्षण देतील, जरी काही काळासाठी, ते तलवारीने मारले जातील किंवा जाळले जातील किंवा पकडले जातील किंवा लुटले जातील.
३४
जेव्हा ते पडतील तेव्हा त्यांना खूप कमी मदत मिळेल आणि प्रामाणिक नसलेले बरेच लोक त्यांच्यात सामील होतील.
३५
सुज्ञानी लोकांपैकी काही अडखळतील, यासाठी की शेवटच्या वेळेपर्यंत ते स्वच्छ, शुद्ध आणि निर्दोष राहतील, कारण अंत नेमलेल्या वेळी होईल.
उताऱ्याचा अभ्यास
एका वचनावर नसून संपूर्ण उताऱ्यावर आधारित भाष्य.
- कोण
- कोठे
- केव्हा
- About
शास्त्रात हे आणखी कोठे सांगितले आहे.
1 इतिहास २८:९
“आणि तू, माझ्या पुत्रा शलोमोना, आपल्या पित्याच्या परमेश्वराचा अंगीकार कर, त्यांची सेवा पूर्ण अंतःकरणाने व स्वखुशीने कर, कारण याहवेह प्रत्येकाचे अंतःकरण पाहतात आणि त्यातील प्रत्येक इच्छा व विचार त्यांना कळतो. जर तू त्यांना शोधशील, तर ते तुला सापडतील; पण जर तू त्यांचा त्याग करशील, तर ते तुझा कायमचा त्याग करतील.वचन ३२ मधूनस्तोत्रसंहिता ९:१०
ज्यांना तुमचे नाव ठाऊक आहे, ते तुमच्यावर भरवसा ठेवतात, कारण हे याहवेह, जे तुमचा धावा करतात त्यांना तुम्ही कधीही टाकत नाही.वचन ३२ मधूनयोहान १७:३
आता सार्वकालिक जीवन हेच आहे: जे तुम्ही एकच सत्य परमेश्वर आहात त्या तुम्हाला व ज्यांना तुम्ही पाठविले, त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.वचन ३२ मधूनजखऱ्याह १०:१२
मी याहवेहमध्ये त्यांना सामर्थ्यवान करेन आणि त्यांच्या नामामध्ये ते सुरक्षितपणे जगतील,” असे याहवेह जाहीर करतात.वचन ३२ मधूनमीखाह ५:७
याकोबाचे उरलेले लोक अनेक लोकांमध्ये असतील, ते याहवेहने पाठविलेल्या दहिवराप्रमाणे, गवतावर पडणाऱ्या पावसाप्रमाणे असतील, जे कोणाचीही वाट पाहत नाही आणि कोणा मनष्यावर अवलंबून राहत नाही.वचन ३२ मधूनमीखाह ५:९
तुझ्या शत्रूंवर विजय मिळवून तुझा हात उंच होईल आणि तुझ्या सर्व शत्रूंचा नाश होईल.वचन ३२ मधून2 तीमथ्य २:१
माझ्या मुला, ख्रिस्त येशूंच्या ठायी जी कृपा आहे, तिच्यात सबळ हो.वचन ३२ मधून2 तीमथ्य २:३
येशू ख्रिस्ताचा एक चांगला सैनिक या नात्याने माझ्यासोबत तू आपल्या दुःखाचा वाटा उचल,वचन ३२ मधूनदानीएल १२:११
“रोजचे यज्ञार्पण बंद होईल व ओसाड करणारा अमंगळ पदार्थ स्थापित होईल तेव्हापासून 1,290 दिवस लोटतील.वचन ३१ मधूनजखऱ्याह १३:९
हा तिसरा भाग अग्नीत घालून चांदी शुद्ध करतात तसा मी शुद्ध करेन. आणि सोन्यासारखी त्यांची परीक्षा करेन. ते मला माझ्या नावाने हाक मारतील आणि मी त्यांच्या हाकेला उत्तर देईन; मी म्हणेन, ‘ते माझे लोक आहेत,’ आणि ते म्हणतील, ‘याहवेह आमचे परमेश्वर आहेत.’ ”वचन ३५ मधूनदानीएल ९:२७
तो एका ‘सप्तका’ साठी अनेकांसोबत कराराची पुष्टी करेल. ‘सप्तका’ मध्ये, यज्ञ करण्यास व अन्नार्पणे वाहण्याचे बंद करेल. आणि मंदिरात अमंगळ वस्तू स्थापित करेल, ज्यामुळे ओसाडी पडेल. नेमलेल्या समाप्तीपर्यंत सर्वनाश करणार्यावर कोपाचा वर्षाव होईल.”वचन ३१ मधून1 योहान २:३
आपल्याला हे माहीत आहे की, जर आपण परमेश्वराच्या आज्ञा पाळतो तर आपल्याला त्यांची ओळख झाली आहे.वचन ३२ मधून

अभ्यास टीप
Settings