Skip to content
1 शमुवेल २६:१-१२

1 शमुवेल २६:१-१२

जिफी लोक गिबियाह येथे शौलाकडे गेले आणि म्हणाले, “जेशीमोनच्या समोर असलेल्या हकीलाहच्या डोंगरावर दावीद लपून राहत नाही काय?”
तेव्हा शौल त्याच्या निवडलेल्या तीन हजार इस्राएली सैनिकांना बरोबर घेऊन दावीदाचा शोध घेण्यासाठी जीफच्या वाळवंटाकडे निघाला.
शौलाने जेशीमोन समोर हकीलाहच्या डोंगरावर जाण्याच्या रस्त्याच्या बाजूला छावणी घातली आणि दावीद रानातच राहिला. परंतु शौल आपल्यामागे आला आहे हे समजून,
दावीदाने आपले दोन सैनिक पाठवून शौल खरोखरच तिथे आला काय याची माहिती काढून घेतली.
नंतर दावीद बाहेर पडला आणि ज्या ठिकाणी शौलाने छावणी टाकली होती तिथे गेला. त्याने पाहिले शौल, नेराचा पुत्र अबनेर, सैन्याचा सेनापती झोपले होते. शौल छावणीच्या आतील बाजूस झोपला होता, त्याच्याभोवती सैन्याचा पहारा होता.
तेव्हा दावीदाने हिथी अहीमेलेख आणि जेरुइयाहचा पुत्र अबीशाई, योआबाचा भाऊ यांना विचारले, “छावणीच्या आत शौलाकडे माझ्याबरोबर कोण जाईल?” अबीशाई म्हणाला, “मी तुझ्याबरोबर जाईन.”
तेव्हा दावीद आणि अबीशाई रात्रीच्या वेळेस सैन्याकडे गेले आणि शौल तिथे छावणीच्या आतमध्ये झोपलेला होता, त्याच्या उशाशी त्याचा भाला जमिनीमध्ये रोवलेला होता. अबनेर आणि सैनिक त्याच्याभोवती झोपलेले होते.
अबीशाई दावीदाला म्हणाला, “परमेश्वराने तुझ्या शत्रूला आज तुझ्या हाती दिले आहे. तर आता मला भाल्याने त्याच्यावर एकच वार करून त्याला जमिनीत खुपसून टाकू द्या; दुसर्‍यांदा वार करावा लागणार नाही.”
परंतु दावीद अबीशाईला म्हणाला, “त्याचा वध करू नको! याहवेहच्या अभिषिक्तावर हात टाकून कोण निर्दोष राहू शकेल?”
१०
दावीद म्हणाला, “जिवंत याहवेहची शपथ, याहवेह स्वतः त्याला मारतील, किंवा त्याची वेळ येईल आणि त्याचा मृत्यू होईल, किंवा तो युद्धात जाईल आणि त्याचा नाश होईल.
११
परंतु मी याहवेहच्या अभिषिक्तावर हात टाकावा असे याहवेह माझ्या हातून घडवून न आणो. तर आता त्याच्या उशाशी असलेला भाला आणि पाण्याचा चंबू घे, मग आपण जाऊ या.”
१२
तेव्हा दावीदाने शौलाच्या उशाशी असलेला भाला आणि पाण्याचा चंबू घेतला आणि ते निघून गेले. कोणीही ते पाहिले नाही किंवा कोणाला ते कळले नाही, किंवा कोणी उठले नाही. ते सर्व झोपी गेले होते, कारण याहवेहकडून त्यांना गाढ निद्रा लागली होती.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options