मुख्य मजकुरावर जा
1 शमुवेल २३:१९-२५

जीपी लोक दावीदाचा शौलाशी विश्वासघात करतात

1 शमुवेल २३:१९-२५
१९
जिफी लोक गिबियाह येथे शौलाकडे गेले आणि म्हणाले, “होरेशच्या गडांमध्ये, हकीलाहच्या डोंगरात, यशीमोनच्या दक्षिणेकडे दावीद आमच्यामध्ये लपून राहत नाही काय?
२०
तर आता, महाराज, जेव्हा तुमची इच्छा होईल तेव्हा खाली या आणि त्याला तुमच्या हाती देण्याची जबाबदारी आमची असेल.”
२१
शौलाने उत्तर दिले, “तुम्ही माझ्यावर जी दया दाखविली त्यामुळे याहवेह तुमचे कल्याण करो.
२२
जा आणि अधिक माहिती मिळवा. दावीद नेहमी कुठे जातो आणि त्याला तिकडे कोणी पाहिले, याचा शोध करा. मला समजले की तो फारच धूर्त आहे.
२३
लपण्यासाठी ज्या ठिकाणांचा तो उपयोग करतो त्यांचा शोध करा आणि निश्चित माहिती घेऊन माझ्याकडे परत या. मग मी तुमच्याबरोबर जाईन; जर तो त्याच भागात असेल, तर यहूदाहच्या सर्व कुळांमधून मी त्याला शोधून काढेन.”
२४
तेव्हा ते बाहेर पडले आणि शौलाच्यापुढे जीफकडे गेले. आता दावीद आणि त्याची माणसे यशीमोनच्या दक्षिणेकडील अराबाह येथे माओनच्या वाळवंटात होती.
२५
शौल आणि त्याच्या माणसांनी शोध सुरू केला आणि जेव्हा दावीदाला याबद्दल सांगण्यात आले तेव्हा तो खाली खडकाकडे गेला आणि माओनच्या वाळवंटात राहिला. जेव्हा शौलाने हे ऐकले तेव्हा तो दावीदाचा पाठलाग करीत माओनच्या वाळवंटात गेला.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options