Skip to content
1 शमुवेल २३:१४-१८

योनाथान दावीदाला भेटून त्याला धीर देतो

1 शमुवेल २३:१४-१८
१४
दावीद अरण्यातील गडांमध्ये आणि जीफच्या डोंगराळ प्रदेशातील रानामध्ये राहू लागला. दिवसेंदिवस शौल त्याचा शोध घेत होता, परंतु परमेश्वराने दावीदाला त्याच्या हाती दिले नाही.
१५
दावीद जीफच्या वाळवंटातील होरेश येथे असताना त्याला कळले की, शौल त्याचा प्राण घेण्यासाठी बाहेर पडला आहे.
१६
आणि शौलाचा पुत्र योनाथान होरेश येथे दावीदाकडे गेला आणि त्याने दावीदाला मदत केली व परमेश्वराठायी सबळ केले.
१७
तो म्हणाला, “भिऊ नकोस, माझा पिता शौल तुझ्यावर हात टाकणार नाही. तू इस्राएलचा राजा होशील आणि मी तुझा दुय्यम होईन, हे माझा पिता शौलसुद्धा जाणून आहे.”
१८
तेव्हा त्या दोघांनी याहवेहसमोर एक करार केला. नंतर योनाथान घरी गेला, परंतु दावीद होरेश येथेच राहिला.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options