मुख्य मजकुरावर जा
1 राजे ६:१-१०

मंदिराच्या बांधकामाची सुरुवात

1 राजे ६:१-१०
इस्राएली लोक इजिप्त देशातून बाहेर पडल्यावर चारशे ऐंशी वर्षानंतर, इस्राएलवर शलोमोनच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षात, दुसर्‍या महिन्यात; म्हणजेच सीव महिन्यात, शलोमोनने याहवेहचे मंदिर बांधण्यास सुरुवात केली.
शलोमोन राजाने याहवेहसाठी जे मंदिर बांधले, त्याची लांबी साठ हात, रुंदी वीस हात आणि उंची तीस हात होती.
मंदिराच्या मुख्य मंडपाच्या समोरच्या वर्‍हांड्याची रुंदी मंदिराच्या रुंदीएवढीच, म्हणजेच वीस हात होती, मंदिराच्या समोरील बाजूने त्याची रुंदी दहा हात होती.
त्यांनी मंदिराच्या वरील बाजूच्या भिंतींमध्ये अरुंद खिडक्या बनविल्या.
मुख्य खोली तसेच पवित्रस्थानाच्या आतील बाजूस त्याने मजले बांधले व त्यात खोल्या केल्या.
सर्वात खालचा मजला पाच हात रुंद, मधला मजला सहा हात आणि तिसरा मजला सात हात. त्याने मंदिराच्या बाहेरील बाजूस तोडे ठेवले म्हणजे मंदिराच्या भिंतींच्या पार काहीही घुसविले जावू नये.
मंदिराच्या बांधकामासाठी खाणीतूनच तयार केलेले दगड वापरण्यात आले होते आणि मंदिर बांधले जात असताना हातोडी, कुर्‍हाड किंवा इतर कोणत्याही लोखंडी हत्याराचा आवाज मंदिराच्या परिसरात ऐकू आला नव्हता.
तळमजल्याचे प्रवेशद्वार मंदिराच्या दक्षिणेस होते; तिथून मधल्या मजल्यापर्यंत आणि तिथून पुढे तिसर्‍या मजल्यापर्यंत एक जिना होता.
त्याने गंधसरूच्या लाकडाच्या तुळया टाकून छप्पर टाकून, मंदिराचे बांधकाम पूर्ण केले.
१०
आणि त्याने मंदिराच्या सभोवतीच्या बाजूने पाच हात उंचीच्या खोल्या बांधल्या व त्या प्रत्येक खोली गंधसरूच्या तुळयांनी मंदिराशी जोडली.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options