Skip to content
1 राजे ५:१३-१८

मंदिराच्या कामगारांची व्यवस्था

1 राजे ५:१३-१८
१३
शलोमोन राजाने सर्व इस्राएलातून तीस हजार पुरुष मजूर घेतले,
१४
शलोमोन लबानोनला प्रत्येक महिन्याला दहा हजार पुरुष आळीपाळीने पाठवित असे, म्हणजे ते लबानोनमध्ये एक महिना व दोन महिने आपल्या घरी राहत असत. अदोनिराम बिगारी कामकर्‍यांवर अधिकारी होता.
१५
डोंगराळ प्रदेशात शलोमोनचे सत्तर हजार ओझी वाहणारे आणि ऐंशी हजार दगड घडविणारे होते,
१६
त्याचप्रमाणे शलोमोनचे तीन हजार तीनशे मुकादम होते, जे प्रकल्पाची देखरेख करून कामगारांचे मार्गदर्शन करीत असत.
१७
राजाच्या आज्ञेनुसार त्यांनी मंदिराच्या पायासाठी खाणीतून उच्च दर्जाचे मोठे दगडे काढले.
१८
शलोमोनचे आणि हीरामाचे कारागीर व गिबली येथील कामकर्‍यांनी मंदिर बांधण्यासाठी लाकूड व दगडे कापून तयार केली.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options