1 करिंथकरांस १०:१४-३२
१४
यास्तव, माझ्या प्रिय मित्रांनो, मूर्तिपूजेपासून दूर पळा.
१५
मी बुद्धिमान लोकांबरोबर बोलतो; मी जे तुम्हाला सांगत आहे त्याची पारख तुम्हीच करा.
१६
उपकारस्तुतीचा प्याला ज्याबद्दल आपण उपकारस्तुती करतो ती ख्रिस्ताच्या रक्तामध्ये सहभागिता नाही का? जी भाकर आपण मोडतो ती ख्रिस्ताच्या शरीराशी सहभागिता नाही का?
१७
कारण भाकर एक आहे, आम्ही पुष्कळजण असलो तरी एक शरीर आहोत, आपण सर्वजण एकाच भाकरीचे सहभागी आहोत.
१८
इस्राएली लोकांचा विचार करा: वेदीवर अर्पण केलेले यज्ञबली जे खातात, ते वेदीशी सहभागी होतात की नाही?
१९
मूर्तींना अर्पिलेल्या अन्नास काही महत्त्व आहे किंवा मूर्तीला काही महत्त्व आहे असा माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे काय?
२०
नाही! गैरयहूदी लोक परमेश्वराला यज्ञ अर्पण करीत नसून भुतांना अर्पण करतात आणि भुतांशी तुम्ही सहभागी व्हावे अशी माझी इच्छा नाही.
२१
तुम्ही प्रभूचा प्याला आणि भुतांचा प्याला यातून एकाच वेळी पिऊ शकणार नाही. तसेच प्रभूचा मेज आणि भुतांचा मेज या दोन्हीमध्ये तुम्हाला एकाच वेळी सहभागी होता येत नाही.
२२
प्रभूला ईर्षेस पेटवावे असा प्रयत्न आपण करतो काय? आपण त्यांच्यापेक्षा शक्तिमान आहोत काय?
२३
“मला प्रत्येक गोष्ट करण्याची मुभा आहे,” असे तुम्ही म्हणता तरी प्रत्येक गोष्ट हितकारक असतेच असे नाही, “मला प्रत्येक गोष्ट करण्याची मुभा असली,” तरी सर्वगोष्टी वृद्धी करीत नाहीत.
२४
कोणी स्वतःचे हित पाहू नये, तर दुसर्याचेही पाहावे.
२५
बाजारात विकत मिळणारे मांस विवेकभावाकरिता प्रश्न न विचारता खा.
२६
कारण, “पृथ्वी व तिच्यातील सर्वकाही प्रभूचे आहे.”
२७
एखाद्या गैरविश्वासू व्यक्तीने तुम्हाला भोजनाचे आमंत्रण दिले आणि तुमची जाण्याची इच्छा असली तर तुमच्यापुढे जे वाढले असेल, ते सदसद्विवेकबुद्धीने प्रश्न न विचारता खावे.
२८
पण समजा, “हे यज्ञात वाहिलेले आहे” असे तुम्हाला कोणी सांगितले, तर ज्याने ही सूचना दिली त्याच्यासाठी व सदसद्विवेकबुद्धीसाठी तुम्ही ते खाऊ नये.
२९
अशा प्रसंगी तुम्ही त्या माणसाची सदसद्विवेकबुद्धीने लक्षात घ्यावी, तुमची नव्हे. माझ्या स्वातंत्र्याचा न्याय दुसर्यांच्या विवेकभावाला अनुसरून का व्हावा?
३०
किंवा जर मी त्या भोजनामध्ये परमेश्वराचे आभार मानून सहभागी झालो, तर ज्यासाठी मी धन्यवाद दिला त्याबद्दल मला दोष का देण्यात यावा?
३१
तुम्ही जे खाता किंवा पिता किंवा जे काही करता ते सर्व परमेश्वराच्या गौरवासाठीच करावे.
३२
यहूदी असोत की गैरयहूदी असोत किंवा परमेश्वराची मंडळी असो, कोणालाही तुमच्यामुळे अडखळण होऊ नये.
Settings