मुख्य मजकुरावर जा

Ziba बद्दल बायबलमधील वचने: His fidelity to David

9 वचने · 2 पैलू

His fidelity to David बद्दल वचने

  1. जेव्हा दावीद डोंगराच्या माथ्यावर काही अंतरावर गेला, तिथे मेफीबोशेथचा कारभारी सीबा त्याला भेटण्यासाठी तिथे वाट पाहत होता. त्याच्याकडे खोगीर घातलेली गाढवे व त्यांच्यावर दोनशे भाकरी, मनुक्यांच्या शंभर ढेपा, अंजिराच्या शंभर ढेपा आणि द्राक्षारसाचा एक बुधला होता.

  2. राजाने सीबाला विचारले, “हे तू का आणले आहेस?” सीबाने उत्तर दिले, “गाढवे राजघराण्यातील लोकांना बसण्यासाठी, भाकरी आणि फळे लोकांना खाण्यासाठी आणि हा द्राक्षारस रानातून जाताना जे कोणी थकून जातात त्यांना ताजेतवाने करण्यासाठी.”

  3. तेव्हा राजाने विचारले, “तुझ्या धन्याचा नातू कुठे आहे?” सीबा त्याला म्हणाला, “तो यरुशलेमात राहत आहे, कारण त्याला असे वाटते, ‘इस्राएलचे लोक मला माझ्या आजोबांचे राज्य आज परत मिळवून देतील.’ ”

  4. तेव्हा राजा सीबाला म्हणाला, “मेफीबोशेथच्या मालकीचे जे सर्व आहे ते आता तुझे आहे.” सीबा म्हणाला, “मी विनम्र अभिवादन करतो, माझ्या स्वामीची माझ्यावर कृपादृष्टी असो.”

  5. त्याच्याबरोबर बिन्यामीन कुळातील एक हजार माणसे होती, त्याचप्रमाणे शौलाच्या घराचा कारभारी सीबा आणि त्याचे पंधरा पुत्र आणि वीस सेवक हे त्याच्याबरोबर होते. यार्देनेकडे जिथे राजा होता तिथे ते घाईने गेले.

  6. तो म्हणाला, “माझ्या स्वामी, मी आपला सेवक अपंग आहे, मी म्हणालो, ‘मी माझ्या गाढवावर खोगीर घालून त्यावर बसून माझ्या राजाबरोबर जाईन.’ परंतु माझा सेवक सीबा याने मला फसविले.

  7. परंतु त्याने आपल्या सेवकाविषयी माझ्या स्वामीला खोटे सांगितले. माझे स्वामी तर परमेश्वराच्या दूताप्रमाणे आहेत; म्हणून आपणास जे योग्य वाटेल ते आपण करावे.

  8. माझ्या आजोबांचे सर्व वारसदार माझ्या स्वामीकडून मरणास पात्र होते, परंतु आपण आपल्या सेवकाला आपल्या मेजावर बसणार्‍यांसह पंक्तीस बसविले. त्यामुळे राजासमोर आणखी काही विनंती करण्याचा मला काय अधिकार आहे?”

  9. राजाने त्याला म्हटले, “आणखी काही का बोलावे? माझी आज्ञा आहे की तू व सीबाने जमीन वाटून घ्यावी.”