मुख्य मजकुरावर जा

Tiglath-Pileser बद्दल बायबलमधील वचने: Forms an alliance with Ahaz; captures Damascus

7 वचने · 2 पैलू

Forms an alliance with Ahaz; captures Damascus बद्दल वचने

  1. आहाज राजाने अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसरकडे आपले दूत पाठवून त्याला संदेश दिला, “मी तुमचा दास आणि पुत्र आहे. वर येऊन अरामी राजा आणि इस्राएली राजा यांच्यापासून माझा बचाव करा, ज्यांनी माझ्यावर आक्रमण केले आहे.”

  2. आणि आहाजाने याहवेहच्या मंदिरातील आणि राजवाड्यातील भांडारांतील चांदी आणि सोने घेतले आणि अश्शूरच्या राजाला भेट म्हणून दिल्या.

  3. अश्शूरच्या राजाने त्याची मागणी ऐकली. त्याने दिमिष्कावर हल्ला केला आणि त्याला ताब्यात घेतले. तेथील लोकांना धरून कीर येथे नेले आणि रसीनलाही ठार मारले.

  4. मग आहाज राजा तिग्लथ-पिलेसर अश्शूरच्या राजाला भेटावयास दिमिष्क येथे गेला. त्याने दिमिष्क येथे एक वेदी पाहिली आणि त्याने, तिचा आकार व आराखडा तयार करून तो उरीयाह याजकाकडे पाठवून दिला.

  5. इस्राएलचा राजा आहाजमुळे याहवेहनी यहूदीयाला नम्र केले होते, कारण त्याने यहूदीयामध्ये दुष्टमार्गाला चालना दिली होती आणि तो याहवेहबरोबर अत्यंत अविश्वासू राहिला.

  6. अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर त्याच्याकडे आला, परंतु त्याने त्याला मदत करण्याऐवजी त्याला त्रास दिला.

  7. आहाज राजाने याहवेहच्या मंदिरातून आणि राजवाड्यातून आणि अधिकाऱ्यांकडून काही वस्तू घेतल्या आणि अश्शूरच्या राजाला भेट म्हणून दिल्या, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही.