The Pomegranate Tree बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
त्यांनी त्या झग्याच्या खालच्या घेर्यावर निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताची व कातलेल्या सुताची डाळिंबे बनविली.
डाळिंबांच्या मध्ये झग्याच्या घेरावर शुद्ध सोन्याच्या घंट्या बनवून लावल्या.
याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे सेवा करण्यासाठी घालावयाच्या झग्याच्या घेराच्या काठावर घंट्या व डाळिंबे एक सोडून एक असे आळीपाळीने लावले.
ते जेव्हा अष्कोल खोर्याजवळ आले. तिथे त्यांनी एक द्राक्षांचा घड असलेली फांदी कापून घेतली. दोन माणसांनी त्यांच्यामध्ये तो एका काठीवर घालून वाहून नेला. त्याचबरोबर त्यांनी काही डाळिंबे आणि अंजिरेही घेतली.
इजिप्त देशाबाहेर या भयंकर ठिकाणी तुम्ही आम्हाला का आणले? या ठिकाणी ना धान्य किंवा अंजीर ना द्राक्षवेल किंवा डाळिंबे आहेत आणि प्यायला पाणीही नाही!”
गहू व जव, द्राक्षमळे, अंजिरे व डाळिंबे, जैतुनाचे तेल व मध यांचा तो देश आहे;
शौल गिबियाहच्या बाहेरील हद्दीवर मिग्रोन येथे डाळिंबांच्या झाडाखाली राहत होता. त्याच्याबरोबर सहाशे लोक होते.
खांबांच्या वरच्या कळसांना सजविण्यासाठी त्याने प्रत्येक जाळ्याला गोलाकारात दोन रांगेत डाळिंबे बनविली. प्रत्येक कळस त्याने असेच घडविले.
किरमिजी सुताप्रमाणे तुझे ओठ आहेत; तुझे ओठ मनमोहक आहेत. ओढणीआड असलेले तुझे गाल डाळिंबाच्या दोन फोडींप्रमाणे आहेत.
तुझी रोपे तर डाळिंबाचा मळा आहे, ज्यात सर्वोत्कृष्ट फळे, मेंदी आणि सुगंधी अगरू आहेत,
ओढणीआड असलेले तुझे गाल डाळिंबाच्या दोन फोडींप्रमाणे आहेत.
दर्याखोर्यात वाढत असलेली नवी झाडे, द्राक्षवेलींना आलेले अंकुर, आणि डाळिंबाला आलेली फुले पाहण्यासाठी मी खाली अक्रोडाच्या झाडांच्या मळ्यात गेलो.
सकाळीच उठून आपण द्राक्षमळ्यात जाऊ; द्राक्षवेली मोहरल्या आहेत की काय, त्यांना कळ्या आल्यात की काय ते पाहू. डाळिंबाच्या झाडांना फुले आलीत काय ते पाहू. आणि तिथे मी माझ्या प्रीतीचा वर्षाव करेन.
मी तुझे मार्गदर्शन केले असते आणि तुला माझ्या आईच्या घरी घेऊन गेले असते— तिने मला शिकविलेला मसालेदार द्राक्षारस मी तुला, माझ्या डाळिंबाचा रस पिण्यास दिला असता.
द्राक्षवेल वाळून गेली आहे अंजिराचे झाड कोमेजले आहे; डाळिंब, खजुराचे आणि सफरचंदाचे झाड; शेतातील सर्व झाडे सुकून गेली आहेत. खचितच लोकांचा आनंद विरून गेला आहे.
धान्याच्या कणगीत एक तरी धान्यकण उरला आहे का? आतापर्यंत द्राक्षवेल, अंजिराच्या झाडाला, डाळिंबाला आणि जैतुनाच्या झाडाला फळे लागलीच नाहीत. “ ‘आजपासून मी तुम्हाला आशीर्वाद देईन.’ ”