मुख्य मजकुरावर जा

The Plague or Pestilence बद्दल बायबलमधील वचने: Desolating effects of

5 वचने · 22 पैलू

Desolating effects of बद्दल वचने

  1. हजार लोक तुझ्याजवळ पडले, आणि दहा हजार तुझ्या उजव्या बाजूला पडले, तरी ती संकटे तुझ्या जवळदेखील येणार नाहीत.

  2. “या राष्ट्रातील थोर आणि लहान सर्व मरतील. त्यांना मूठमाती मिळणार नाही, कोणी त्यांच्यासाठी शोक करणार नाही. प्रथेप्रमाणे दुःखाचे चिन्ह म्हणून ते स्वतःच्या शरीरास दुखापत करणार नाहीत किंवा डोक्याचे मुंडण करणार नाहीत.

  3. शोक करणार्‍यांना अन्न देऊन कोणी त्यांचे—त्यांच्या आई वा वडिलांच्या मृत्यूबद्दल—समाधान करणार नाही. सांत्वन करण्यासाठी कोणी त्यांना प्यालाभर द्राक्षारसही देणार नाही.

  4. जर एका घरात फक्त दहाच लोक उरले असले तरीही ते सर्व मरतील.

  5. आणि मृतदेह जाळण्यासाठी घरातून बाहेर काढायला आलेल्या त्याच्या नातेवाईकांनी तिथे लपून बसलेल्या कोणाला विचारले तर तुझ्यासोबत आणखी कोणी आहे काय? आणि तो म्हणेल, “नाही,” तो त्याला पुढे म्हणेल, “गप्प राहा, याहवेहचे नाव घेऊ नको.”