The, is God Holy Spirit बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
तुमच्या आत्म्यापासून दूर मी कुठे जाऊ? तुमच्या समक्षतेपासून दूर मी कुठे पळू?
मी वर स्वर्गात गेलो, तरी तिथे तुम्ही आहात; अधोलोकात माझे अंथरूण केले, तर तिथेही तुम्ही आहातच.
मी पहाटेच्या पंखांवर स्वार होऊन अत्यंत दूरच्या महासागरापलिकडे वस्ती केली,
तर तिथेही तुमचा हात मला धरून चालवील; तुमचा उजवा हात मला आधार देईल.
मी म्हणालो, “अंधार मला लपवून टाकेल, आणि माझ्या सभोवतीचा प्रकाश रात्रीत बदलून जाईल,”
अंधकार देखील तुमच्यापुढे अंधकार नाही, कारण तुमच्यापुढे रात्र दिवसासारखीच प्रकाशमान आहे; कारण अंधकार हा तुम्हाला प्रकाशासमान आहे.
माझ्या शरीरातील अंतरंगाची घडण तुम्हीच केली आहे; माझ्या मातेच्या उदरात माझी देहरचना केली.
नंतर मी प्रभूची वाणी ऐकली, “मी कोणाला पाठवावे? आणि आपल्यासाठी कोण जाईल?” मी उत्तर दिले, “हा मी इथे आहे, मला पाठवा!”
ते म्हणाले, “जा आणि या लोकांना सांग: “ ‘ते नेहमी पाहत राहिले, तरी त्यांना दिसत नाही, ते नेहमी कानांनी ऐकत असले, तरी त्यांना ऐकू येत नाही व ते ग्रहण करत नाहीत.’
या लोकांचे अंतःकरण असंवेदनशील करा; त्यांचे कान मंद आणि त्यांचे डोळे बंद करा. नाहीतर ते त्यांच्या डोळ्यांनी पाहतील, त्यांच्या कानांनी ऐकतील, अंतःकरणापासून समजतील, आणि ते मागे वळतील आणि बरे होतील.”
कारण प्रभू ख्रिस्ताला पाहिल्याशिवाय तुला मरण येणार नाही, असे पवित्र आत्म्याने त्याला प्रकट केले होते.
पवित्र आत्म्याने प्रवृत्त होऊन तो मंदिराच्या परिसरात गेला. तेव्हा आईवडिलांनी नियमशास्त्रात सांगितलेला विधी पूर्ण करण्यासाठी येशू बाळाला मंदिरात आणले,
तेव्हा शिमोनाने बाळाला आपल्या हातात घेतले आणि परमेश्वराची स्तुती करीत म्हटले:
“हे सर्वशक्तिमान प्रभू, तुमच्या वचनाप्रमाणे आता तुमच्या सेवकाला शांतीने घेऊन जावे.
जेव्हा तो येईल, तेव्हा पापाविषयी, नीतिमत्त्वाविषयी व न्यायनिवाड्या विषयी जग कशी चूक करत आहे हे तो सिद्ध करेल.
पापाविषयी, कारण जगातले लोक मजवर विश्वास ठेवीत नाहीत;
नीतिमत्त्वाविषयी, कारण मी पित्याकडे जात आहे आणि तुम्ही मला यापुढे पाहणार नाही;
न्यायनिवाड्या विषयी, कारण या जगाच्या अधिपतीला दोषी ठरविण्यात आले आहे.
पेत्र व योहानाची सुटका झाल्याबरोबर, ते दुसर्या शिष्यांकडे गेले आणि मुख्य याजकगण आणि वडीलजन जे काही म्हणाले, ते सर्व त्यांना सांगितले.
त्यांचे हे विवरण ऐकून सर्व विश्वासणार्यांनी मोठ्या स्वराने मिळून परमेश्वराकडे प्रार्थना केली: “सार्वभौम प्रभू, तुम्ही आकाश, पृथ्वी, सागर व त्यातील सर्वकाही निर्माण केले आहे.
पवित्र आत्म्याद्वारे तुम्ही, तुमचा सेवक आणि आमचा पिता दावीदाच्या मुखातून बोलला आहात: “ ‘राष्ट्रे कट का रचत आहेत आणि लोक व्यर्थच कुटिल योजना का करीत आहेत?
ज्याप्रकारे पवित्र आत्मा म्हणतो: “आज, जर तुम्ही त्यांची वाणी ऐकाल,
तर तुमची अंतःकरणे कठीण करू नका, जशी रानात परीक्षा होत असताना तुम्ही बंडखोरी केली होती.
जरी त्यांनी माझी कृत्ये चाळीस वर्षे पाहिली होती तरी तुमच्या पूर्वजांनी माझी परीक्षा घेऊन मला कसोटीस लावले.