मुख्य मजकुरावर जा

The, is God Holy Spirit बद्दल बायबलमधील वचने: As omnipresent

7 वचने · 26 पैलू

"The, is God Holy Spirit" साठी शोधा

As omnipresent बद्दल वचने

  1. तुमच्या आत्म्यापासून दूर मी कुठे जाऊ? तुमच्या समक्षतेपासून दूर मी कुठे पळू?

  2. मी वर स्वर्गात गेलो, तरी तिथे तुम्ही आहात; अधोलोकात माझे अंथरूण केले, तर तिथेही तुम्ही आहातच.

  3. मी पहाटेच्या पंखांवर स्वार होऊन अत्यंत दूरच्या महासागरापलिकडे वस्ती केली,

  4. तर तिथेही तुमचा हात मला धरून चालवील; तुमचा उजवा हात मला आधार देईल.

  5. मी म्हणालो, “अंधार मला लपवून टाकेल, आणि माझ्या सभोवतीचा प्रकाश रात्रीत बदलून जाईल,”

  6. अंधकार देखील तुमच्यापुढे अंधकार नाही, कारण तुमच्यापुढे रात्र दिवसासारखीच प्रकाशमान आहे; कारण अंधकार हा तुम्हाला प्रकाशासमान आहे.

  7. माझ्या शरीरातील अंतरंगाची घडण तुम्हीच केली आहे; माझ्या मातेच्या उदरात माझी देहरचना केली.