मुख्य मजकुरावर जा

The Heathen बद्दल बायबलमधील वचने: Salvation of, foretold

11 वचने · 37 पैलू

Salvation of, foretold बद्दल वचने

  1. पण शेवटच्या दिवसात याहवेहच्या मंदिराचे पर्वत बळकट व उंच असे स्थापित केले जाईल; सर्व पर्वतांपेक्षा ते उंचावले जाईल, आणि सर्व राष्ट्रे त्याकडे एकत्र येतील.

  2. अनेक लोक येतील आणि म्हणतील, “चला, आपण याहवेहच्या पर्वताकडे, याकोबाच्या परमेश्वराच्या मंदिराला जाऊ. ते आपले मार्ग आम्हाला शिकवतील, म्हणजे आम्ही त्या मार्गावर चालू.” कारण सीयोनमधून नियमशास्त्र, यरुशलेमातून याहवेहचे वचन बाहेर जाईल.

  3. ते राष्ट्रांमध्ये न्याय करतील, आणि अनेक लोकांमधील वाद मिटवतील. ते आपल्या तलवारी ठोकून त्यांचे नांगराचे फाळ करतील, व भाल्यांचे आकडे बनवतील. एक देश दुसऱ्या देशाविरुद्ध तलवार उगारणार नाही, तसेच ते यापुढे लष्करी प्रशिक्षण देणार नाहीत.

  4. “ऊठ, प्रकाशमान हो, कारण तुझा प्रकाश आला आहे, आणि याहवेहचे गौरव तुझ्यावर उदय पावले आहे.

  5. पाहा, काळोख पृथ्वीला आच्छादित आहे, आणि गडद अंधकार लोकांवर येत आहे, परंतु याहवेहचा तुझ्यावर उदय होत आहे, आणि त्यांचे गौरव तुझ्यावर प्रकट होत आहे.

  6. राष्ट्रे तुझ्या प्रकाशात येतील, आणि राजे तुझ्या उदयाच्या तेजामध्ये येतील.

  7. “आपली दृष्टी वर कर आणि सभोवती पाहा: सर्व सभा एकत्र येऊन तुझ्याकडे येत आहे; तुझे पुत्र दूरवरून येत आहेत, तुझ्या कन्या कमरेवर उचलून आणण्यात येत आहेत.

  8. मग तू ते बघशील व उल्हासित होशील, तुझे अंतःकरण स्पंदेल व आनंदाने फुगून जाईल; सागराची संपत्ती तुझ्याकडे आणण्यात येईल, अनेक देशांची समृद्धी तुझ्याकडे येईल.

  9. उंटांचे काफिले तुझी भूमी व्यापतील, तरुण उंट मिद्यान व एफाह येथून येतील. आणि सर्व शबातून सोने व ऊद घेऊन तुझ्याकडे येतील. आणि याहवेहच्या स्तुतीची घोषणा केली जाईल.

  10. केदारचे सर्व कळप तुला दिले जातील व नबायोथचे मेंढे तुला सेवेसाठी देण्यात येतील; ते माझ्या वेद्यांवर अर्पण म्हणून मान्य केले जातील, आणि मी माझे गौरवशाली मंदिर सुशोभित करेन.

  11. “मेघाप्रमाणे उडणारे हे कोण आहे, जणू घरट्यांकडे परतणारी कबुतरे?