The Heathen बद्दल बायबलमधील वचने: Employed to chastise the Church
Employed to chastise the Church बद्दल वचने
“देशांकडे पाहा आणि लक्षपूर्वक बघ— आणि अत्यंत आश्चर्यचकित हो. कारण आता मी तुझ्या काळात जे कार्य करणार आहे जरी ते तुला सांगितले तरी त्यावर तुझा विश्वास बसणार नाही.
मी बाबेलच्या लोकांना उभारणार आहे, ते निर्दयी आणि उतावळे लोक आहेत, जे संपूर्ण पृथ्वीला पादाक्रांत करीत आहेत ते स्वतःचे नसलेले आवास काबीज करतील.
ते दहशत वाटेलसे व भीतिदायक लोक आहेत; ते स्वतःचाच कायदा बनवितात आणि स्वतःचाच मान राखतात.
त्यांचे घोडे चित्त्यांपेक्षा चपळ आहेत, संधिप्रकाशात फिरणार्या लांडग्यापेक्षाही ते उग्र आहेत. त्यांचे घोडदळ बेफामपणे पुढे धाव घेते; त्यांचे स्वार दूर देशातून येतात. भक्ष्यावर तुटून पडणाऱ्या गरुडांप्रमाणे ते झेप घेतात;
हिंसाचार करण्याच्या योजनेनेच ते सर्व येतात, वाळवंटातील वावटळीप्रमाणे त्यांची टोळी येते आणि वाळूच्या कणांप्रमाणे ते बंदिवान गोळा करतात.