- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
The Anger of God बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
पृथ्वीवर जिवंत असलेले सर्व प्राणी नष्ट झाले—त्यात आकाशातील पक्षी, पाळीव जनावरे, वन्यपशू, सरपटणारे प्राणी आणि अखिल मानवजात या सर्वांचा समावेश होता.
कोरड्या जमिनीवर राहणारा, श्वास घेणारा प्रत्येक प्राणी मरण पावला.
पृथ्वीवर असलेल्या प्रत्येक सजिवांचा नाश झाला; मानव आणि प्राणी आणि सरपटणारे प्राणी आणि पक्षी पृथ्वीवरून नाहीसे झाले. फक्त नोआह आणि त्याच्यासोबत तारवात असलेलेच वाचले.
दुसर्या दिवशी पहाटेच ते डोंगराळ प्रदेशाकडे डोंगराच्या शिखराकडे असे म्हणत निघाले, “याहवेहने वचन दिलेल्या देशाकडे वर जाण्यास आम्ही तयार आहोत. खरोखरच आम्ही पाप केले आहे!”
परंतु मोशे म्हणाला, “तुम्ही याहवेहचा आज्ञाभंग का करता? यात तुम्हाला यश मिळणार नाही!
वर जाऊ नका, कारण याहवेह तुमच्यासोबत नाहीत. तुमचा तुमच्या शत्रूकडून पराभव होईल,
कारण अमालेकी व कनानी लोक तिथे तुम्हाला सामोरे येतील. कारण तुम्ही याहवेहपासून मागे फिरला आहात, ते तुमच्याबरोबर नाहीत आणि तुम्ही तलवारीने मरून पडाल.”
जरी त्यांनी डोंगराळ प्रदेशाच्या उंच शिखरापर्यंत जाण्याची धिटाई केली, तरी मोशे किंवा याहवेहच्या कराराचा कोश छावणीतून हलले नाहीत.
मग त्या डोंगराळ देशात राहणारे अमालेकी व कनानी लोक खाली आले व त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि होरमाहपर्यंत त्यांना मारत आले.
हे याकोबाच्या परमेश्वरा, तुम्ही फटकारल्यावर घोडे आणि स्वार गाढ झोपेत गेले आहेत.
तुम्हीच एकटेच भयास योग्य आहात. जेव्हा आपण रागावता, तेव्हा आपल्यासमोर कोण उभा राहू शकतो?
स्वर्गातून तुम्ही आपला निर्णय जाहीर केला, तेव्हा पृथ्वीचा थरकाप उडाला आणि ती स्तब्ध झाली—
त्यांनी त्यांच्यावर आपला तीव्र राग, क्रोध, संताप आणि शत्रुत्व— आणि नाश करणारा देवदूतांचा एक गट सोडला.
त्यांनी आपल्या क्रोधास मोकळी वाट करून दिली; त्यांनी त्यांचे जीव मृत्यूपासून वाचविले नाहीत, तर त्यांना पीडेच्या हवाली केले.
इजिप्त देशाच्या प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ पुत्रांस त्यांनी ठार केले; जे हामाच्या डेर्यातील पौरुषाचे प्रथमफळ होते.
“जर त्याच्या मुलांनी माझ्या नियमांचा त्याग केला आणि माझे विधी पाळले नाहीत,
माझ्या आज्ञेचे पालन केले नाही आणि माझे नियम भंग केले,
मी त्यांच्या पापांचा छडीने समाचार घेईन, व दुष्कृत्यांसाठी चाबकाच्या फटकार्यांची शिक्षा करेन.
तुमच्या क्रोधाने आम्ही भस्म होतो; तुमच्या संतापाने आम्ही दडपून जातो.
तुम्ही आमचे अपराध आपल्यापुढे पसरून ठेवता; तुमच्या सानिध्यात आमची सर्व गुप्त पातकेही प्रकाशात येतात.
तुमच्या क्रोधाच्या छायेखाली आम्ही आमचे जीवन जगतो; कण्हत आमची वर्षे सरतात.
बरेचदा परमेश्वराने त्यांना सोडविले, तरी त्यांच्याविरुद्ध ते बंडखोरी करीत राहिले आणि शेवटी त्यांच्याच पापामुळे ते नाश पावले.
असे असतानाही परमेश्वराने त्यांच्या यातनांची दखल घेतली आणि त्यांचा आक्रोश ऐकला;
त्यांच्याकरिता त्यांनी आपल्या कराराचे स्मरण केले, आणि त्यांच्या महान प्रीतीमुळे त्यांचे अंतःकरण द्रवले.
“मी एफ्राईमचे आक्रंदन निश्चितच ऐकले: ‘तुम्ही मला अनावर वासराला लावावी तशी शिस्त लावली आहे, आणि मी ही शिस्त ग्रहण केली आहे. मला पुन्हा माझ्या पूर्वस्थितीत आणा, म्हणजे मी पूर्ववत होईन, कारण तुम्ही याहवेह, माझे परमेश्वर आहात.