मुख्य मजकुरावर जा

Siege बद्दल बायबलमधील वचने: Distress of the inhabitants during

10 वचने · 4 पैलू

Distress of the inhabitants during बद्दल वचने

  1. काही काळानंतर अरामचा बेन-हदाद राजाने आपल्या सर्व सैन्याची जमवाजमव करून शोमरोनावर स्वारी केली आणि त्याला वेढा दिला.

  2. शोमरोन शहरात फार मोठा दुष्काळ पडला; वेढा इतका काळ राहिला की गाढवाचे मुंडके चांदीच्या ऐंशी शेकेलला आणि कबुतराची एक पावशेर विष्ठा पाच शेकेलला विकली गेली.

  3. एके दिवशी इस्राएलाचा राजा तटावरून फेर्‍या मारीत असताना, एक स्त्री मोठ्याने ओरडून त्याला म्हणाली, “माझे स्वामी महाराज, मला साहाय्य करा!”

  4. राजाने उत्तर दिले, “खुद्द याहवेह तुला साहाय्य करीत नाही, तर मी तुझी साहाय्यता कशी करू? खळ्यातून की द्राक्षकुंडातून?”

  5. मग राजाने तिला विचारले, “तुला काय झाले आहे?” स्त्रीने उत्तर दिले, “या स्त्रीने मला म्हटले, ‘तू आपला मुलगा दे म्हणजे आज आपण त्याला खाऊ आणि उद्या आपण माझ्या मुलाला खाऊ.’

  6. तेव्हा आम्ही माझ्या मुलाला शिजवून खाल्ले. दुसर्‍या दिवशी मी तिला म्हणाले, ‘आता तुझ्या मुलाला आण म्हणजे आपण त्याला खाऊ,’ पण तिने त्याला कुठेतरी लपवून ठेवले.”

  7. चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवशी, शहरातील दुष्काळ इतका भयंकर झाला की लोकांना खाण्यासाठी अन्न राहिले नाही.

  8. उजव्या बाजूला असलेले ते फस्त करतील परंतु ते भुकेले राहतील; डाव्या बाजूला असलेलेही खातील परंतु समाधानी होणार नाहीत. प्रत्येकजण स्वतःच्याच संततीचे मांस खातील:

  9. परंतु सेनापतीने उत्तर दिले, “माझ्या धन्याने मला या गोष्टी सांगायला पाठवले होते, ते काय फक्त तुझ्या धन्याला आणि तुला सांगण्यासाठी आणि भिंतीवर बसलेल्या लोकांसाठी नाही काय; ज्यांना तुझ्यासारखेच त्यांची स्वतःचीच विष्ठा खावी लागेल आणि स्वतःचेच मूत्र प्यावे लागेल?”

  10. मी त्यांना त्यांच्या पुत्र आणि कन्यांचे मांस खाण्यास लावेन, आणि त्यांचे शत्रू त्यांच्या सभोवतीच्या वेढ्याने त्यांच्यावर एवढा दबाव आणतील की ते एक दुसऱ्याचे मांस खातील.’