मुख्य मजकुरावर जा

Shaphan बद्दल बायबलमधील वचने: 2. Father of Ahikam and grandfather of Gedaliah

10 वचने · 3 पैलू

2. Father of Ahikam and grandfather of Gedaliah बद्दल वचने

  1. त्याने याजक हिल्कियाह, शाफानाचा पुत्र अहीकाम आणि मिखायाहचा पुत्र अकबोर आणि शाफान चिटणीस आणि राजाचा सेवक असायाह यांना हा आदेश दिला:

  2. बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने शाफानचा पुत्र अहीकामचा पुत्र गदल्याहला, यहूदीयाहमध्ये उरलेल्या लोकांवर अधिकारी म्हणून नियुक्त केले.

  3. त्याने हिल्कियाह, शाफानाचा पुत्र अहीकाम आणि मीखाहचा पुत्र अब्दोन आणि शाफान चिटणीस आणि राजाचा सेवक असायाह यांना हा आदेश दिला:

  4. परंतु शाफानचा पुत्र हा अहीकाम यिर्मयाहच्या बाजूने उभा राहिला व त्याला मारण्यासाठी त्याला जमावाच्या हवाली करण्यात आले नाही.

  5. सैनिक पाठवून यिर्मयाहला पहारेकऱ्यांच्या आंगणातून बाहेर आणले व त्याला परत त्याच्या घरी नेण्यासाठी शाफानचा नातू व अहीकामचा पुत्र गदल्याह याच्याकडे सोपविले. मग यिर्मयाह देशामध्ये उरलेल्या त्याच्या लोकांमध्ये राहिला.

  6. यिर्मयाह वळून त्याच्यापुढून जाण्याआधी नबुजरदान म्हणाला, “शाफानचा पुत्र अहीकाम याचा पुत्र गदल्याह याच्याकडे परत जा. त्याला बाबेलच्या राजाने यहूदीया प्रांतातील नगरांवर राज्यपाल नेमले आहे. त्याच्यासह या लोकांबरोबर राहा किंवा तुझ्या मर्जीप्रमाणे तुला पाहिजे तिकडे जा.” नंतर नबुजरदानने त्याला शिदोरी व भेट दिली व त्याला सोडून दिले.

  7. शाफानचा पुत्र अहीकाम याचा पुत्र गदल्याह याने त्यांना व त्यांच्या लोकांना पुनः खात्री देण्यासाठी शपथ घेतली. तो म्हणाला, “खास्द्यांच्या अधिकार्‍यांची सेवा करण्यास भिऊ नका, देशात स्थायिक व्हा आणि बाबेलच्या राजाची सेवा करा, आणि तुमचे बरे होईल.

  8. यहूदीया प्रांतामध्ये अजून काही लोक उरले आहेत, बाबेलच्या राजाने सर्वांनाच कैद करून नेले नाही व शाफानचा नातू, अहीकामचा पुत्र गदल्याह हा राज्यपाल म्हणून नियुक्त झाला आहे, असे मोआब, अम्मोन, एदोम, या प्रांतात व आजूबाजूच्या देशात असलेल्या यहूद्यांनी ऐकले, तेव्हा

  9. नथन्याहचा पुत्र इश्माएल व त्याच्या सोबतीची दहा माणसे एकाएकी उठली. त्यांनी तलवारी उपसल्या व ज्याची बाबेलच्या राजाने राज्यपाल म्हणून नेमणूक केली होती, तो शाफानचा नातू, अहीकामचा पुत्र गदल्याहस, ठार मारले.

  10. त्या जमावात पुरुष, स्त्रिया, मुले, राजाच्या कन्या व तसेच पहारेकऱ्यांचा नायक नबुजरदान याने अहीकामचा पुत्र, शाफानचा नातू गदल्याहच्या स्वाधीन केलेले सर्व लोक होते. त्यांनी यिर्मयाह संदेष्टा व नेरीयाहचा पुत्र बारूख ह्यांनाही आपल्याबरोबर घेतले.