Skip to content

Self-Examination बद्दल बायबलमधील वचने: General references

20 वचने · 9 पैलू

General references बद्दल वचने

  1. मी किती चुका आणि पाप केलेत? माझे पाप आणि माझे अपराध मला दाखवा.

  2. भीती बाळगा आणि पाप करू नका. बिछान्यावर असता शांत अंतःकरणाने त्यांचे चिंतन करा. सेलाह

  3. स्वतःच्या चुका कोणाला समजणार? माझ्या गुप्त दोषांबद्धल मला क्षमा करून निर्दोष ठरवा.

  4. याहवेह, माझी परीक्षा घ्या, माझे परीक्षण करा, माझे मन आणि हृदयाची पारख करा.

  5. रात्रीच्या वेळी मी माझी गाणी आठवीत असे; माझे हृदय विचारमग्न होई आणि माझ्या आत्म्याने विचारले:

  6. माझ्या मार्गासंबंधी मी विचार केला, आणि तुमच्या नियमाचे पालन करण्याकडे माझी पावले वळविली आहेत.

  7. हे परमेश्वरा, माझे परीक्षण करा आणि माझे अंतःकरण पारखून पहा; माझे चिंताग्रस्त विचार बारकाईने तपासून पाहा.

  8. बघा की एखादी वाईट प्रवृत्ती तर माझ्यात नाही, आणि मग मला सार्वकालिक जीवनाच्या मार्गाने घेऊन जा.

  9. सर्वात कपटी काही असेल तर, ते म्हणजे अंतःकरण आणि ते बरे करण्याच्या पलीकडे आहे. हे कळण्यास कोण समर्थ आहे?

  10. आपण स्वतःच्या आचरणांचे निरीक्षण करू व त्यांची परीक्षा घेऊ, आणि परत याहवेहकडे वळू.

  11. सर्वसमर्थ याहवेह म्हणतात ते असे: “तुम्ही तुमच्या आचरणाकडे नीट लक्ष द्या.

  12. येशूंचे हे उद्गार ऐकताच शिष्यांची अंतःकरणे दुःखी झाली आणि ते त्यांना विचारू लागले, “प्रभूजी, खरोखर तो मी तर नाही ना?”

  13. ते दुःखाने भरून गेले आणि एकामागून एक त्यांना विचारू लागले, “खरोखर तो मी तर नाही ना?”

  14. आणि म्हणून, जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खातो किंवा प्रभूचा प्याला पितो, तो प्रभूचे शरीर आणि रक्त याविरुद्ध पाप करतो.

  15. याच कारणासाठी ही भाकर खाण्यापूर्वी आणि हा प्याला पिण्यापूर्वी प्रत्येकाने आपले आत्मपरीक्षण करावे.

  16. परंतु जर तुम्ही स्वतःला पडताळून पाहिले असते, तर तुमचा असा न्याय झाला नसता.

  17. तुम्हीच स्वतःचे परीक्षण करा. तुम्ही निश्चित विश्वासात आहात की नाही; तुमची परीक्षा करून पाहा. ख्रिस्त येशू तुम्हामध्ये आहे हे तुम्हाला कळत नाही तर कदाचित तुम्ही परीक्षेत उतरला नाहीत?

  18. आपण कोणी नसताना कोणी आहोत असा विचार करणारा स्वतःचीच फसगत करतो.

  19. प्रत्येकाने आपल्या कृतींची परीक्षा करावी, कारण मगच त्याला स्वतःबद्दल आढ्यता बाळगता येईल आणि स्वतःची इतरांबरोबर तुलना करण्याची गरज वाटणार नाही.

  20. आपल्यातील प्रत्येकाने आपापला भार वाहिला पाहिजे.