Skip to content

Scoffing बद्दल बायबलमधील वचने

58 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. हे ऐकून परूश्यांनी त्यांचा उपहास केला, कारण ते पैशावर प्रेम करत होते.

  2. पण काहीजण थट्टा करीत म्हणाले, “हे द्राक्षारसाचे अति सेवन करून मस्त झाले आहे.”

  3. परंतु यहूद्यांनी समुदाय पाहिला, तेव्हा त्यांना हेवा वाटला आणि पौल जे बोलत होता त्याला विरोध करून त्यांनी त्याची निंदानालस्ती केली.

  4. तेव्हा एपिकूरपंथी व स्तोयिकपंथी यांच्यातील काही तत्वज्ञानी लोक त्याच्याशी वाद घालू लागले. त्यांच्यापैकी काहीजण म्हणाले, “हा बडबड्या काय सांगण्याचा प्रयत्न करीत आहे?” इतर म्हणाले, “हा परक्या परमेश्वराचा प्रचारक दिसतो.” ते असे बोलत, कारण पौल येशू व पुनरुत्थान या विषयीच्या शुभवार्तेचा प्रचार करीत होता.

  5. मरण पावलेल्यांच्या पुनरुत्थानाबद्दल पौल बोलला, तेव्हा ऐकणार्‍यांपैकी काहींनी टोमणे मारले, परंतु इतर म्हणाले, “आम्हाला याविषयी पुढे कधी तरी ऐकावयास आवडेल.”

  6. तर ज्याने परमेश्वराच्या पुत्राला पायाखाली तुडविले, शुद्ध करणारे साक्षीचे रक्त अपवित्र मानले, जेणेकरून ते स्वतः पवित्र झाले होते आणि कृपाशील पवित्र आत्म्याचा अपमान केला तो किती अधिक कठोर शिक्षा होण्यास पात्र ठरेल म्हणून तुम्हाला वाटते?

  7. सर्वात प्रथम तुम्ही हे समजून घ्या की, शेवटच्या दिवसात थट्टा करणारे येतील, थट्टा करतील आणि स्वतःच्या वाईट वासनांच्या मागे लागतील.

  8. ते म्हणतील, “त्यांच्या येण्याचे दिलेले ‘येत आहे’ हे वचन आता कुठे आहे? आमचे पूर्वज मरण पावले, तरी सर्वकाही उत्पत्तीच्या प्रारंभापासून होते तसेच चालू आहे.”