River बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
तुमच्या भवनातील विपुलतेतून तुम्ही त्यांना तृप्त करता; आपल्या आनंदाच्या नद्यांचे पाणी तुम्ही त्यांना पाजता.
आपल्या परमेश्वराच्या परमपवित्र वसतिस्थानातून एक आनंददायी नदी वाहते; तिचे प्रवाह परमेश्वराच्या नगरास आनंद देतात.
माझ्या डोळ्यांतून अश्रूंचे ओघ वाहतात, कारण तुमच्या नियमांचे उल्लंघन करण्यात येत आहे.
प्रत्येकजण वाऱ्यापासून आश्रयस्थान आणि वादळापासून आश्रयस्थान, वाळवंटामध्ये असलेल्या पाण्याच्या प्रवाहासारखा आणि तहानलेल्या भूमीमध्ये मोठ्या खडकाच्या सावलीसारखा असेल.
माझ्या लोकांच्या विनाशामुळे माझ्या डोळ्यांतून अश्रूंचे प्रवाह निघत आहेत.
त्या मनुष्याने मला परत मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे आणले आणि मी मंदिराच्या उंबरठ्याखालून पूर्वेकडे पाणी बाहेर येत असताना पाहिले (कारण मंदिराचे तोंड पूर्वेकडे होते). मंदिराच्या दक्षिणेकडून, वेदीच्या दक्षिणेकडून पाणी खाली येत होते.
मग त्याने मला उत्तरेकडील द्वाराने बाहेर आणले, पूर्वेकडे तोंड असलेल्या बाहेरील द्वाराच्या सभोवार फिरविले, आणि पाण्याचे थेंब दक्षिणेच्या बाजूने पडत होते.
तो मनुष्य आपल्या हातात मापनदोरी घेऊन पूर्वेच्या दिशेने गेला, त्याने एक हजार हात मापले आणि घोट्यापर्यंत खोल पाण्यातून मला नेले.
त्याने आणखी हजार हात मापले आणि गुडघ्यापर्यंत खोल पाण्यातून मला नेले. त्याने आणखी हजार हात मापले आणि कंबरेपर्यंत खोल पाण्यातून मला नेले.
त्याने आणखी हजार हात मापले, परंतु आता ती अशी नदी होती जी मी पार करू शकलो नाही, कारण पोहून जाता येईल इतके ते पाणी वाढले होते; अशी नदी जी कोणीही पार करू शकत नव्हते.
त्याने मला विचारले, “मानवपुत्रा, तू हे पाहतोस काय?” मग त्याने मला परत नदीच्या किनारी नेले.
जेव्हा मी तिथे गेलो, तेव्हा नदीच्या दोन्ही बाजूंना मी पुष्कळ झाडे पाहिली.
तो मला म्हणाला, “हे पाणी पूर्वेच्या प्रदेशाकडे वाहत जाऊन खाली अराबाहमध्ये जाते, तिथे ते मृत समुद्रात जाऊन मिळते. जेव्हा ते समुद्रात जाते, तेव्हा खारट पाणी गोड होते.
जिथे पाणी वाहील, तिथे जिवंत प्राण्यांचे थवे राहतील. तिथे पुष्कळ मासे असतील, कारण ते पाणी तिथे वाहत जाऊन खारट पाणी गोड करते; म्हणून जिथे नदी वाहते तिथे सर्वकाही जिवंत राहेल.
तिच्या किनारी मासेमारी करणारे उभे राहतील; एन-गेदीपासून एन-एग्लाइमपर्यंत जाळे पसरविण्यासाठी जागा असेल. भूमध्य समुद्रातील माशांप्रमाणे तिथे पुष्कळ प्रकारचे मासे असतील.
परंतु पानथळ आणि दलदल शुद्ध होणार नाही; ते खारटच राहतील.
नदीच्या दोन्ही बाजूंना सर्वप्रकारच्या फळांची झाडे वाढतील. त्यांची पाने वाळणार नाहीत, ना त्यांची फळे संपतील. प्रत्येक महिन्यात ते फळे देतील, कारण त्यांच्याकडे पवित्रस्थानातून पाणी वाहते. त्यांची फळे खाण्यासाठी व त्यांची पाने आरोग्यासाठी वापरली जातील.”
मग देवदूताने मला जीवनाच्या पाण्याची नदी दाखविली. तिचे पाणी स्फटिकासारखे नितळ होते. परमेश्वर आणि कोकरा यांच्या राजासनांतून ती निघाली होती.
राजमार्गाच्या मध्यावरून ती वाहत होती. नदीच्या दोन्ही बाजूंना जीवनदायी वृक्ष उभे होते, त्यांना वर्षातून बारा वेळा बहर येई. प्रत्येक महिन्याला त्यांना नवी फळे येत. त्यांची पाने राष्ट्रांना निरोगी करण्यासाठी औषध म्हणून वापरली जात.