मुख्य मजकुरावर जा

Punishment बद्दल बायबलमधील वचने

35 वचने · 2 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. हे याहवेह, मी कुठवर तुमचा धावा करावा? पण तुम्ही ऐकत नाहीत? मी तुम्हाला ओरडून हाक मारतो, “हिंसा!” पण तुम्ही वाचवित नाहीत.

  2. तुम्ही मला अन्यायाकडे का पहायला लावता? तुम्ही चुकीचे कार्य का सहन करता? विनाश आणि हिंसाचार माझ्यापुढे होत आहे; वाद व कलह वाढत आहेत.

  3. म्हणून कायदा नेभळा झाला आहे, आणि योग्य न्याय कधीही दिला जात नाही, दुष्टांनी नीतिमानांना वेढले आहे, म्हणून कायदा विपरीत केला जातो.

  4. त्यांचे सोने किंवा त्यांची चांदी त्यांना याहवेहच्या क्रोधापासून वाचवू शकणार नाही.” त्यांच्या ईर्षेच्या अग्नीने संपूर्ण पृथ्वी भस्म होईल, कारण जे सर्व पृथ्वीवर रहिवास करतात त्यांचा ते अकस्मातपणे अंत करतील.

  5. जे तुमच्या शरीराचा वध करू शकतात, परंतु आत्म्याचा नाश करू शकत नाहीत, अशांना भिऊ नका. तर तुमचा आत्मा आणि शरीर या दोहोंचा नरकामध्ये जे नाश करू शकतात, त्या परमेश्वराचे मात्र भय धरा.

  6. “अहो सापांनो! विषारी सापांच्या पिलांनो! नरक-दंडापासून स्वतःची सुटका कशी कराल?

  7. तुम्ही सर्वसाधारण मनुष्य असून न्याय करता, पण तीच कृत्ये स्वतः करता तर, तुम्ही परमेश्वराच्या न्यायातून सुटाल असे तुम्हाला वाटते का?

  8. अन्याय करणार्‍यास त्याच्या अन्यायाचे प्रतिफळ मिळेल, पक्षपात होणार नाही.

  9. ज्या तारणाची प्रभूने प्रथम घोषणा केली आणि ऐकणार्‍यांनी आम्हाला पुष्टी दिली, त्या महान तारणाची आपण उपेक्षा केली, तर आपण कसे निभावू?

  10. तुमच्याशी जे बोलत आहेत, त्यांच्या आज्ञा तुम्ही कटाक्षाने पाळा. कारण जगातील संदेश देणार्‍याची आज्ञा न पाळल्यामुळे इस्राएली लोकांची शिक्षेपासून सुटका झाली नाही, मग स्वर्गातून ताकीद देणार्‍याचे आपण ऐकले नाही, तर आपण किती मोठ्या संकटात सापडू?