Skip to content

Punishment बद्दल बायबलमधील वचने: Delayed punishment

16 वचने · 2 पैलू

Delayed punishment बद्दल वचने

  1. तुम्ही हे करीत असता मी गप्प राहिलो, तेव्हा तुम्हाला वाटले की मी तुमच्यासारखाच आहे, परंतु आता तुम्हाला शासन करण्याचा काळ आला आहे; तुमचे आरोप मी तुमच्यापुढे ठेवणार.

  2. परमेश्वर प्राचीन काळापासून राजासनारूढ आहेत, जे बदलत नाहीत— ते त्यांचे ऐकतील व त्यांना नम्र करतील, कारण त्यांना परमेश्वराचे भय नाही. सेला

  3. परंतु जेव्हा मी बोलाविले तेव्हा तुम्ही ऐकण्याचे नाकारले, आणि जेव्हा मी माझे हात पुढे केले, तेव्हा कोणीही लक्ष दिले नाही.

  4. कारण तुम्ही माझा सल्ला जुमानला नाही. आणि माझे धमकाविणे स्वीकारले नाहीत,

  5. यामुळेच मी देखील तुमच्या संकटकाळी तुम्हाला हसेन; जेव्हा तुमच्यावर आपत्ती येईल तेव्हा मी चेष्टा करेन—

  6. जेव्हा आपत्ती तुम्हाला वादळासारखी ग्रासून टाकेल, जेव्हा अनर्थ तुम्हाला वावटळीसारखे वाहून नेईल, जेव्हा संकटे आणि त्रास तुम्हाला पूर्णपणे दडपून टाकतील.

  7. “तेव्हा तुम्ही मला हाक माराल, परंतु मी उत्तर देणार नाही; ते माझा शोध करतील, परंतु मी सापडणार नाही,

  8. कारण त्यांनी ज्ञानाचा तिरस्कार केला, आणि याहवेहचे भय धरणे निवडले नाही.

  9. ते माझा सल्ला स्वीकारणार नाहीत; आणि माझ्या दटावणीला झिडकारतील म्हणून,

  10. त्यांना त्यांच्या मार्गाचे प्रतिफळ मिळेल, आणि त्यांच्या वाईट कृत्यांचे पुरेपूर परिणाम मिळतील.

  11. जर एखाद्या अपराधासाठी त्वरित शिक्षा करण्यात आली नाही, तर लोकांचे हृदय चुकीचे कार्य करण्याच्या योजनेने भरतात.

  12. जर एखादा दुष्ट मनुष्य शंभर गुन्हे करतो तरी तो दीर्घायुष्य जगतो, तरी मला माहीत आहे की जे परमेश्वराचे भय बाळगतात व जे त्यांचा आदर करतात त्यांचे अधिक हित होईल.

  13. दुष्ट परमेश्वराचे भय बाळगत नाहीत, म्हणून त्यांचे भले होणार नाही आणि संध्याकाळच्या सावलीप्रमाणे त्यांचे दिवस वाढणार नाही.

  14. हे याहवेह, मी कुठवर तुमचा धावा करावा? पण तुम्ही ऐकत नाहीत? मी तुम्हाला ओरडून हाक मारतो, “हिंसा!” पण तुम्ही वाचवित नाहीत.

  15. तुम्ही मला अन्यायाकडे का पहायला लावता? तुम्ही चुकीचे कार्य का सहन करता? विनाश आणि हिंसाचार माझ्यापुढे होत आहे; वाद व कलह वाढत आहेत.

  16. म्हणून कायदा नेभळा झाला आहे, आणि योग्य न्याय कधीही दिला जात नाही, दुष्टांनी नीतिमानांना वेढले आहे, म्हणून कायदा विपरीत केला जातो.