मुख्य मजकुरावर जा

Private Prayer बद्दल बायबलमधील वचने: Christ was constant in

6 वचने · 28 पैलू

Christ was constant in बद्दल वचने

  1. त्यांना निरोप दिल्यावर, येशू प्रार्थना करण्यासाठी डोंगरावर गेले. रात्र झाली तरी तिथे ते एकांती होते.

  2. मग येशू आपल्या शिष्यांसोबत गेथशेमाने नावाच्या ठिकाणी आले आणि येशू त्यांना म्हणाले, “मी तिथे जाऊन प्रार्थना करेपर्यंत येथे बसा.”

  3. मग थोडे पुढे जाऊन ते भूमीवर पालथे पडून त्यांनी प्रार्थना केली, “हे माझ्या पित्या, शक्य असल्यास हा प्याला माझ्यापासून दूर करा. तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तर तुमच्या इच्छेप्रमाणे होवो.”

  4. अगदी पहाटेस, अंधार असताना, ते उठले आणि घर सोडून एकांतस्थळी गेले आणि तिथे त्यांनी प्रार्थना केली.

  5. एकदा येशू एकटेच प्रार्थना करीत होते आणि त्यांचे शिष्य जवळच होते. येशूंनी त्यांना विचारले, “मी कोण आहे म्हणून लोकसमुदाय मला ओळखतात?”

  6. येशू प्रार्थना करीत असताना त्यांच्या मुखाचे रूपांतर झाले आणि त्यांची वस्त्रे विजेसारखी लखलखीत झाली.