मुख्य मजकुरावर जा

Patriotism बद्दल बायबलमधील वचने

63 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आमची त्वचा भट्टीप्रमाणे तप्त झाली आहे, कारण भुकेमुळे आम्ही तापाळलेले आहोत.

  2. स्त्रियांना सीयोनात भ्रष्ट करण्यात आले आहे, व कुमारिकांना यहूदीयातील नगरात.

  3. आमच्या अधिपतींना त्यांच्या हातांवर लटकविण्यात आले आहे; आमच्या वडीलजनांचा मान राखला जात नाही.

  4. तरुण गिरणीवर काबाडकष्ट करतात; तर किशोर लाकडाच्या भारी ओझ्यांखाली डळमळतात.

  5. वडीलजनांनी वेशीतील बैठकी सोडून दिल्या आहेत; तरुणांनी त्यांचे संगीत बंद केले आहे.

  6. आमच्या हृदयातील आनंद निघून गेला आहे; आमच्या नृत्यांचे रूपांतर विलापात झाले आहे.

  7. आमच्या मस्तकावरील मुकुट धुळीत पडला आहे. धिक्कार असो आमचा, कारण आम्ही पाप केले आहे!

  8. याकारणास्तव आमची अंतःकरणे खचली आहेत, या सर्व गोष्टींमुळे आमचे डोळे निस्तेज झाले आहेत.

  9. सीयोन पर्वत आता ओसाड झाला आहे, तिथे आता लांडगे शिकारीसाठी संचार करतात.

  10. हे याहवेह, तुमचे शासन सदासर्वकाळचे आहे; तुमचे राजासन पिढ्यान् पिढ्या स्थिर आहे.

  11. मग तुम्ही आम्हाला नेहमी का विसरता? तुम्ही आमचा इतक्या दीर्घकालापर्यंत त्याग का केला?

  12. याहवेह, तुम्ही आमचा स्वतःशी पुनः संबंध स्थापित करा, म्हणजे आम्ही तुमच्याकडे परत येऊ; पूर्वीच्या दिवसांसारखे आमच्या दिवसांना नवनिर्मित करा,

  13. जर तुम्ही आमच्यावर मर्यादेपलिकडे क्रोधित झाला नसाल आणि आमचा कायमचा त्याग केला नसेल तर.