Skip to content

Patriotism बद्दल बायबलमधील वचने

63 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जेव्हा तुम्ही याहवेह तुमचे परमेश्वराने वतन दिलेल्या देशात प्रवेश कराल, तो जिंकून त्याचा ताबा घ्याल आणि तिथे वस्ती कराल,

  2. तेव्हा याहवेह तुमच्या परमेश्वराने दिलेल्या भूमीतील प्रत्येक पिकाचे प्रथम उत्पन्न एका टोपलीत आणावे. नंतर याहवेह तुमचे परमेश्वर आपल्या नावासाठी जे वसतिस्थान निवडून देतील त्या ठिकाणी तुम्ही जावे

  3. आणि त्यावेळी सेवा करीत असलेल्या याजकास म्हणा, “याहवेह तुमच्या परमेश्वराला आज मी जाहीर करतो, की आमच्या पूर्वजांना वचन देऊ केलेल्या देशात मी आलो आहे.”

  4. मग याजक ती टोपली तुमच्या हातून घेऊन याहवेह तुमच्या परमेश्वराच्या वेदीपुढे ठेवेल.

  5. नंतर तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर म्हणावेः “आमचे पूर्वज अरामी, हे निर्वासित होऊन आश्रयासाठी इजिप्त देशास गेले. ते संख्येने अगदी थोडे होते, पण इजिप्त देशात ते एक विशाल, बलाढ्य आणि थोर राष्ट्र बनले.

  6. इजिप्त देशातील लोकांनी आम्हाला वाईट रीतीने वागविले, आमच्यावर जुलूम केला व कठोर परिश्रम लादले

  7. तेव्हा आम्ही याहवेहचा, आमच्या पूर्वजांच्या परमेश्वराचा धावा केला आणि याहवेहने आमचे गार्‍हाणे ऐकले, आमच्या अडचणी जाणल्या आणि आमच्यावर होत असलेला जुलूम व अत्याचार त्यांनी पाहिला.

  8. मग याहवेहने महान चमत्कारांनी, सामर्थ्यशाली बाहुबलाने व पसरलेल्या हातांनी आणि भयावह चिन्ह व चमत्कार करून आम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणले.

  9. त्यांनी आम्हाला या ठिकाणी आणले आणि दुधामधाचे प्रवाह वाहत असलेला हा देश आम्हाला दिला;

  10. आता, हे याहवेह परमेश्वरा, तुम्ही जी भूमी आम्हाला दिली आहे, त्यात उगविलेल्या धान्याचे प्रथम उत्पन्न आम्ही आणले आहे.” नंतर ते अर्पण तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वरापुढे ठेवावे व त्यांची उपासना करावी.

  11. त्यानंतर याहवेह तुमच्या परमेश्वराने ज्या सर्व चांगल्या गोष्टी तुम्हाला दिल्या, त्याबद्दल तुम्ही, लेवी व परदेशी लोक या सर्वांनी मिळून आनंदोत्सव साजरा करावा.

  12. सीयोनचे हित करणे, यरुशलेमेचे कोट बांधणे तुम्हाला प्रसन्न करो.

  13. संगीत निर्देशकाकरिता. कोरहाच्या पुत्रांची रचना. एक स्तोत्र. हे याहवेह, तुमच्या भूमीवर तुम्ही कृपा केली आहे; याकोबाचे ऐश्वर्य तुम्ही त्याला परत दिले आहे.

  14. तुम्ही आपल्या लोकांच्या अपराधाची क्षमा केली आणि त्यांच्या पातकावर पांघरूण घातले. सेला

  15. म्हणजेच तुमचा सर्व क्रोध शांत झाला आहे, तुमचा भडकलेला संताप आता शमला आहे.

  16. हे परमेश्वरा, आमच्या उद्धारकर्त्या, आम्हाला पुनर्स्थापित करा. आमच्याविरुद्ध तुमचा क्रोध पुन्हा भडकू देऊ नका.

  17. तुम्ही आमच्यावर सतत कोपलेले राहणार आहात काय? पिढ्यान् पिढ्यांवर तुमचा राग टिकून राहणार आहे काय?

  18. तुमचे लोक तुमच्या ठायी हर्षित व्हावे, म्हणून तुम्ही आम्हाला पुनरुज्जीवित करणार नाही काय?

  19. हे याहवेह, तुमच्या अक्षयप्रीतीचा आम्हावर वर्षाव करा आणि तुमचे तारण आम्हाला प्रदान करा.

  20. परमेश्वर याहवेह जे बोलतील, ते सर्व मी ऐकणार; कारण त्यांनी आपल्या लोकांना व आपल्या भक्तांना शांतीचे अभिवचन दिले आहे. परंतु आपल्या लोकांनी मूर्खपणा करण्याचे थांबवावे.

  21. याहवेहचे भय बाळगणारे खरोखरच त्यांच्या तारणाच्या समीप असतात; मग आपला देश त्यांच्या गौरवाने भरून जाईल.

  22. प्रीती आणि विश्वसनीयता एकमेकांना भेटले आहेत; नीतिमत्व आणि शांती यांनी एकमेकांचे चुंबन घेतले आहे.

  23. पृथ्वीतून विश्वसनीयता उदय पावत आहे, आणि स्वर्गातून नीतिमत्व अवलोकन करीत आहे.

  24. याहवेह उत्तम गोष्टीं आम्हाला प्रदान करणार आहेत, आणि आमची भूमी मुबलक पीक देणार आहे.

  25. नीतिमत्व त्यांच्या पुढे चालेल आणि प्रभूच्या पावलांसाठी मार्ग सिद्ध करेल.