Skip to content

Pardon बद्दल बायबलमधील वचने

89 वचने · 58 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्यांच्यामध्ये परमेश्वराच्या विपुल कृपेद्वारे व त्यांच्या रक्ताद्वारे खंडणी म्हणून आपल्याला पापांची क्षमा देऊन

  2. त्यांच्यामध्ये आपणास खंडणी, अर्थात् पापांची क्षमा मिळाली आहे.

  3. जेव्हा तुम्ही स्वतःच्या पातकांमध्ये व शारीरिक असुंतेमध्ये मृत होता, त्यावेळी परमेश्वराने ख्रिस्तामध्ये तुम्हाला जिवंत केले आणि आपल्या सर्व पातकांची क्षमा केली.

  4. मी त्यांच्या दुष्कृत्यांची क्षमा करेन व यापुढे त्यांची पापे स्मरणार नाही.”

  5. खरे म्हणजे, नियमाप्रमाणे अंदाजे प्रत्येक वस्तू रक्तसिंचन करूनच शुद्ध करण्यात येई; आणि रक्त सांडल्याशिवाय पापांची क्षमा होत नाही.

  6. कारण बैलांचे व शेळ्यांचे रक्त पापे दूर करण्यास असमर्थ आहे.

  7. मग पुढे ते म्हणतात, “त्यांची पापे व नियमबाह्य कृत्ये यापुढे मी स्मरणार नाही.”

  8. सत्याचे ज्ञान झाल्यानंतर जर आपण जाणूनबुजून पाप करतो, तर त्या पापांसाठी दुसरे कोणतेही अर्पण राहिले नाही,

  9. पण राहिले ते भयावह न्यायाची प्रतीक्षा आणि परमेश्वराच्या शत्रूंना भस्मसात करून टाकणारी मोठी आगच.

  10. विश्वासाने केलेली प्रार्थना त्या रोग्याला बरे करेल; प्रभू त्याला उठवेल. जर त्यांनी पाप केले असेल, तर त्यांची क्षमा होईल.

  11. परंतु जसे ते प्रकाशात आहेत, तसे आम्ही प्रकाशामध्ये चाललो, तर आमची एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्यांचा पुत्र येशू यांचे रक्त सर्व पापापासून आम्हाला शुद्ध करते.

  12. जर आपण आपली पापे त्यांच्याजवळ कबूल करतो, तर ते विश्वसनीय व न्यायी आहेत, म्हणून आपल्या पापांची क्षमा करतील आणि सर्व अनीतीपासून आपल्याला शुद्ध करतील.

  13. माझ्या प्रिय मुलांनो, मी तुम्हाला लिहित आहे, कारण येशूंच्या नावामुळे तुमच्या पातकांची क्षमा झाली आहे.

  14. ज्याचा शेवट मरणात नाही, असे पाप कोणा भावाच्या किंवा बहिणीच्या हातून घडताना तुम्हाला आढळले, तर परमेश्वराने त्यांना क्षमा करावी म्हणून तुम्ही प्रार्थना करावी आणि परमेश्वर त्यांना जीवन देईल. मी त्यांच्या बाबतीत सांगतो, ज्यांचे पाप त्यांना मरणाकडे नेत नाही. असे एक पाप आहे जे मरणाकडे घेऊन जाते. त्याबद्दल तुम्ही प्रार्थना करावी असे मी म्हणत नाही.