Skip to content

Mercy Seat बद्दल बायबलमधील वचने

22 वचने · 12 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. “प्रायश्चिताचे झाकण शुद्ध सोन्याचे बनवावे—ते अडीच हात लांब व दीड हात रुंद असावे.

  2. मग झाकणाच्या टोकांना घडवून घेतलेल्या सोन्याचे दोन करूब करून ठेवावेत.

  3. एका बाजूस एक करूब आणि दुसर्‍या बाजूस दुसरे करूब असावे; ते करूब झाकणास दोन्ही बाजूंनी अखंड जोडून घ्यावे.

  4. या करुबांची पंखे वरच्या बाजूने पसरून प्रायश्चिताच्या झाकणावर आच्छादले जावे. करुबाचे मुख समोरासमोर असून, त्यांची दृष्टी प्रायश्चिताच्या झाकणाकडे असावी.

  5. हे प्रायश्चिताचे झाकण कोशाच्या वर ठेवावे आणि कराराच्या नियमाच्या पाट्या ज्या मी तुला देणार त्या कोशाच्या आत ठेवाव्यात.

  6. तिथे, प्रायश्चिताच्या झाकणावर दोन करूब जे कोशावर ठेवलेले आहेत, त्यांच्यामध्ये मी तुला भेटेन आणि इस्राएल लोकांसाठी द्यावयाच्या सर्व आज्ञा मी तुला देईन.

  7. प्रायश्चिताचे झाकण परमपवित्रस्थानात कराराच्या कोशावर ठेवावे.

  8. “पाहा, मी यहूदाहच्या गोत्रातील, हूराचा पुत्र उरी याचा पुत्र बसालेल याला निवडले आहे.

  9. व मी त्याला परमेश्वराचा आत्मा, ज्ञान, समज, बुद्धी आणि सर्वप्रकारच्या कुशलतेने भरले आहे—

  10. “जसे सभामंडप, कराराच्या नियमाचा कोश व त्यावरील प्रायश्चिताचे झाकण, आणि तंबूचे इतर सर्व साहित्य:

  11. नंतर त्याने शुद्ध सोन्याचे प्रायश्चिताचे झाकण बनविले; जे अडीच हात लांब व दीड हात रुंद होते.

  12. मग त्याने कराराच्या नियमाच्या पाट्या घेतल्या व त्या कोशामध्ये ठेवल्या, कोशाचे दांडे जोडले व त्यावर प्रायश्चिताचे झाकण लावले.

  13. याहवेह मोशेला म्हणाले, “तुझा भाऊ अहरोन याला सांग की कोश व प्रायश्चिताचे झाकण असलेल्या पडद्यामागील परमपवित्रस्थानात त्याची इच्छा होईल तेव्हा येऊ नये, नाही तर त्याला मरण येईल. कारण दयासनावरील ढगात मी प्रकट होत राहीन.

  14. तो धूप त्याने याहवेहसमोर निखार्‍यांवर असा टाकावा की, धूपाच्या धुराने दहा आज्ञांच्या दगडी पाट्या ठेवलेला कोश व त्यावरील दयासन व्यापून जाईल; म्हणजे तो मरणार नाही.

  15. मग त्याने गोर्‍ह्याचे काही रक्त घेऊन ते आपल्या बोटांनी दयासनाच्या पूर्वेस शिंपडावे आणि काही रक्त दयासनासमोर सात वेळा शिंपडावे.

  16. “नंतर त्याने बाहेर जाऊन लोकांसाठी आणलेल्या पापार्पणाच्या बोकडाचा वध करावा; बोकडाचे रक्त अंतरपटाच्या आत घेऊन जावे आणि गोर्‍ह्याचे रक्त त्याने ज्या ठिकाणी शिंपडले, त्याच ठिकाणी म्हणजे दयासनावर व दयासनासमोर ते शिंपडावे.

  17. जेव्हा मोशे याहवेहशी बोलण्यासाठी सभामंडपात गेला, तेव्हा कराराच्या नियमाच्या कोशावर असलेल्या प्रायश्चिताच्या झाकणावरून, दोन करुबांमधून त्याच्याशी बोलत असलेली वाणी त्याने ऐकली. अशाप्रकारे याहवेह त्याच्याशी बोलले.

  18. संगीत निर्देशकाकरिता. “कराराची कुमुदिनी” च्या चालीवर आधारित. आसाफाची रचना. एक स्तोत्र. इस्राएलाच्या मेंढपाळा, आमचा धावा ऐका, तुम्हीच योसेफाला मेंढरांच्या कळपाप्रमाणे चालविले. करुबांच्या मध्ये विराजमान असलेले, तुमचे तेजस्वी गौरव प्रगट करा.

  19. ख्रिस्ताच्या सांडलेल्या रक्ताने विश्वासाद्वारे प्रायश्चिताचा यज्ञ व्हावा म्हणून परमेश्वराने त्यांना प्रस्तुत केले. यासाठी की मागे केलेल्या आपल्या पापांसाठी त्यांच्या सहनशीलतेमुळे दंड मिळू नये, तर त्यांचे नीतिमत्व प्रगट व्हावे.

  20. तेव्हा आपल्यावर दया व्हावी आणि गरजेच्यावेळी साहाय्य मिळण्यासाठी आपल्याला कृपा प्राप्त व्हावी, म्हणून आपण धैर्याने प्रत्यक्ष परमेश्वराच्या कृपेच्या सिंहासनाजवळ जाऊ या.

  21. दुसर्‍या पडद्याच्या मागे एक खोली होती; तिला परमपवित्रस्थान म्हणत असत.

  22. आणि दयासनावर छाया करणारे गौरवी करूबीम होते; पण एवढा तपशील पुरे.