Skip to content

Meekness बद्दल बायबलमधील वचने: General references

92 वचने · 29 पैलू

General references बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. नम्र लोक खातील आणि तृप्त होतील; जे याहवेहचा शोध करतात, ते त्यांची स्तुती करतील. तुमची हृदये सर्वदा सजीव असो!

  2. ते नम्रजनांस नीतिमत्वाच्या मार्गावर नेतात, आणि त्यांना आपल्या मार्गाचे शिक्षण देतात.

  3. वाईटाचा त्याग कर आणि चांगले ते कर; शांतीचा शोध घे व तिच्यामागे लाग.

  4. परंतु नम्र लोकांना पृथ्वीचे वतन मिळेल आणि ते विपुल शांती व समृद्धीचा उपभोग घेतील.

  5. स्वर्गातून तुम्ही आपला निर्णय जाहीर केला, तेव्हा पृथ्वीचा थरकाप उडाला आणि ती स्तब्ध झाली—

  6. पृथ्वीवरील पीडितांचे रक्षण करण्यासाठी, परमेश्वर उठून उभे राहिले तेव्हा असे झाले. सेला

  7. याहवेह नम्रजनांस आधार देतात, परंतु दुर्जनास बहिष्कृत करतात.

  8. कारण याहवेहला आपल्या लोकांमुळे संतोष होतो; ते नम्रजनांस विजयी करतात.

  9. जो सहनशील आहे, तो मोठा शहाणा आहे; पण उतावळ्या स्वभावाचा मनुष्य मूर्खता प्रकट करतो.

  10. कोमल उत्तराने राग शांत होतो, परंतु कठोर शब्द क्रोध वाढवितात.

  11. तापट मनुष्य कलह उत्पन्न करतो, तर शांत स्वभावाचा मनुष्य तंटा मिटवितो.

  12. योद्धा असण्यापेक्षा शांत स्वभावी असणे बरे, शहर जिंकून घेणार्‍यापेक्षा स्वतःवर ताबा ठेवणारा उत्तम.

  13. कलहाच्या वातावरणात मेजवानी खाण्यापेक्षा शांती व समाधानाने भाकरीचा कोरडा तुकडा खाणे बरे.

  14. मनुष्याची सुज्ञता त्याला मंदक्रोधी राखते; आणि चुकांकडे दुर्लक्ष करणे त्याची प्रतिष्ठा असते.

  15. कलहापासून दूर राहणे मनुष्याचा सन्मान आहे, परंतु प्रत्येक मूर्ख भांडणास तत्पर असतो.

  16. सहनशीलते द्वारे शासकाचे मन वळविता येते, कारण मृदू जिव्हा हाडे मोडू शकते.

  17. टवाळी करणारे शहरात गोंधळ करतात, परंतु सुज्ञ लोक राग घालवून टाकतात.

  18. एखाद्या कामाचा शेवट त्याच्या आरंभापेक्षा बरा, आणि गर्वापेक्षा सहनशीलता बरी.

  19. जर तुझ्या अधिपतीचा राग तुझ्यावर भडकला, तर आपले स्थान सोडू नकोस; विनम्रता मोठे अपराध शांतविते.

  20. परंतु ते नीतिमत्त्वाने गरजवंत लोकांचा न्याय करतील, न्यायाने ते पृथ्वीवरील गरिबांसाठी निर्णय देतील. ते त्यांच्या मुखाच्या काठीने पृथ्वीवर हल्ला करतील; ते त्यांच्या ओठांच्या श्वासाने दुष्टांचा वध करतील.

  21. नम्र लोक पुन्हा याहवेहच्या सानिध्यात हर्षोल्हास करतील; गरजवंत इस्राएलचे पवित्र परमेश्वराच्या सानिध्यात आनंद साजरा करतील.

  22. कारण ते याहवेहनेच त्याच्यावर लादले आहे म्हणून त्याने एकांतात शांत बसावे.

  23. त्याला त्याचे मुख धुळीत पुरू दे— तरी आशा कायम असेल.

  24. जे त्याला चपराक मारतात, त्यांच्यापुढे त्याने दुसरा गालही करावा, आणि तो सर्व अपमानाने भरून जाऊ दे.

  25. दोन व्यक्ती एकमताचे झाल्यावाचून ते सोबत चालू शकतील काय?