Skip to content

Master बद्दल बायबलमधील वचने

39 वचने · 3 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तुम्ही मला ‘गुरुजी’ आणि ‘प्रभूजी’ असे संबोधता आणि ते खरे आहे, यासाठी की तो मी आहे.

  2. आता ज्याअर्थी मी तुमचा प्रभू व गुरू असूनही तुमचे पाय धुतले, तसेच तुम्ही सुद्धा एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत.

  3. आता जो परिश्रम करतो त्याची मजुरी त्याचे दान नसून त्याचा अधिकार आहे.

  4. आणि धन्यांनो, तुमच्या दासांशी तसेच वागा. त्यांना धमक्या देऊ नका. कारण तुम्हाला ठाऊक आहे की तुमचा व त्यांचा दोघांचाही एकच धनी जे स्वर्गात असून त्यांच्याजवळ पक्षपात नाही.

  5. धन्यांनो, तुम्ही तुमच्या दासांना जे उचित व योग्य ते द्या; कारण तुम्हाला माहीत आहे की तुम्हालासुद्धा स्वर्गात स्वामी आहे.

  6. कारण पवित्रशास्त्र म्हणते, “बैल धान्याची मळणी करीत असताना, त्याला मुसके बांधू नको” आणि “कामकरी आपल्या वेतनास पात्र आहे!”

  7. माझी विनंती माझा पुत्र अनेसिम जो मी बंधनात असताना माझा आत्मिक पुत्र झाला त्याच्या संदर्भात आहे.

  8. तो यापूर्वी तुला उपयोगी नव्हता, परंतु आता तो आपल्या दोघांनाही, तुला व मला उपयोगी आहे.

  9. तो माझा प्राण आहे—त्याला मी तुझ्याकडे—परत पाठवित आहे.

  10. शुभवार्तेमुळे मी या बंधनात असताना माझी मदत करण्यासाठी त्याने तुझी जागा घेतली असती आणि त्याला येथेच ठेवणे मला आवडले असते.

  11. परंतु तुझ्या संमतीशिवाय काहीही करणे मला योग्य वाटले नाही, यासाठी की जे काही औदार्य तू करशील ते बळजबरीने केल्यासारखे नसावे परंतु स्वेच्छेने केलेले असावे.

  12. कदाचित या कारणासाठी तो थोडा काळ तुझ्यापासून वेगळा झाला असेल, जेणेकरून तू त्याला सर्वकाळासाठी प्राप्त करून घ्यावे.

  13. परंतु येथून पुढे दास नव्हे, तर दासापेक्षा योग्य असा प्रिय बंधू व्हावे. तो मला अतिशय प्रिय आहे, परंतु व्यक्तिगत रीतीने आणि प्रभूमध्ये बंधू या दोन्हीही नात्याने तो तुला अधिक प्रिय आहे.

  14. पाहा! ज्या कामकर्‍यांनी तुमची शेते कापली, त्यांचे वेतन तुम्ही दिले नाही ते तुमच्याविरुद्ध आक्रोश करीत आहेत. कापणी करणार्‍यांचा आक्रोश सेनाधीश प्रभूच्या कानावर गेला आहे.