Skip to content

Love बद्दल बायबलमधील वचने

29 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. अगे कन्ये, ऐक, काळजीपूर्वक लक्ष दे; तू आपली माणसे आणि आपल्या पित्याचे घर विसर.

  2. तेव्हा राजा तुझ्या सौंदर्यात आनंद करेल; त्याचा आदर कर, कारण तो तुझा स्वामी आहे.

  3. उत्कृष्ट भोजनाने व्हावे तसा मी तृप्त होईल; गीत गाणार्‍या ओठांनी मी तुमची स्तुती करेन.

  4. माझ्या बिछान्यावर मी तुमचे स्मरण करतो; रात्रीच्या प्रत्येक प्रहरी मी तुमचे मनन करतो.

  5. कारण परमेश्वर सीयोनचे रक्षण करतील यहूदाह प्रांतातील शहरे ते पुन्हा स्थापित करतील. त्यांचे लोक तिथे वस्ती करतील आणि तेथील अधिकार घेतील;

  6. त्यांच्या सेवकांच्या मुलांनाही हा देश वतन म्हणून मिळेल, त्यांच्या नावावर प्रीती करणारे सर्वजण तिथे वसती करतील.

  7. स्वर्गात तुमच्याशिवाय माझे कोण आहे? पृथ्वीवर तुमच्याएवढे प्रिय मला दुसरे कोणीही नाही.

  8. माझे शरीर व माझे हृदय खचेल, तरी परमेश्वर माझ्या हृदयाचे सामर्थ्य असून सर्वकाळचा माझा वाटा आहेत.

  9. आणि जे विदेशी याहवेहशी एकनिष्ठ राहतात, जे त्यांची सेवा करतात, त्यांच्या नावावर प्रीती करतात, आणि त्यांचे सेवक झाले आहेत, जे सर्व त्यांच्या शब्बाथास अपवित्र न करता त्याचे पालन करतात, आणि माझा करार दृढ धरून राहतात—

  10. अशांना मी माझ्या पवित्र पर्वतावर आणेन आणि माझ्या प्रार्थना मंदिरामध्ये त्यांना आनंदित करेन. त्यांच्या होमार्पणे व अर्पणांचा माझ्या वेदीवर स्वीकार केला जाईल; कारण माझ्या घराला सर्व राष्ट्रांसाठी प्रार्थनेचे घर असे म्हणतील.”

  11. “जा आणि यरुशलेमच्या लोकांस याची घोषणा कर: “याहवेह असे म्हणतात: “ ‘मला आठवण आहे, मला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही एखाद्या नववधूप्रमाणे मजवर कशी प्रीती केली. आणि रानात व पेरणीरहित भूमीत देखील मला अनुसरला.

  12. इस्राएल हे याहवेहकरिता पवित्र होते; त्यांच्या हंगामाचे प्रथमफळ होते. ज्यांनी त्यांचा नाश केला, त्यांच्यावर दोष लावण्यात आला आणि घोर आपत्तीने त्यांना गाठले,’ ” असे याहवेह जाहीर करतात.

  13. येशूंनी उत्तर दिले, “ ‘प्रभू तुमचे परमेश्वर यांच्यावर तुमच्या पूर्ण हृदयाने आणि तुमच्या पूर्ण जिवाने आणि तुमच्या पूर्ण मनाने प्रीती करा.’

  14. हीच सर्वात पहिली आणि महान आज्ञा आहे.

  15. येशूंनी उत्तर दिले, “सर्वात महत्त्वाची आज्ञा ही आहे: ‘हे इस्राएला ऐक: प्रभू आपले परमेश्वर एकच प्रभू आहेत.

  16. प्रभू तुमचे परमेश्वर यांच्यावर तुमच्या पूर्ण हृदयाने, तुमच्या पूर्ण जिवाने आणि तुमच्या पूर्ण मनाने आणि तुमच्या पूर्णशक्तीने प्रीती करा.’

  17. “योग्य बोललात, गुरुजी” त्या मनुष्याने उत्तर दिले, “परमेश्वर ‘एकच आहेत आणि त्यांच्याशिवाय दुसरे परमेश्वर नाहीत’ हे आपण बरोबर सांगितले आहे.

  18. त्यांच्यावर पूर्ण अंतःकरणाने आणि तुमच्या पूर्ण जिवाने आणि तुमच्या पूर्णशक्तीने प्रीती करणे आणि जशी स्वतःवर तशी तुमच्या शेजार्‍यावर प्रीती करणे, हे सर्व प्रकारची होमार्पणे व बली वाहण्यापेक्षा फारच महत्त्वाचे आहे.”

  19. जर कोणाजवळ ऐहिक संपत्ती असेल आणि तो पाहतो की त्याचा भाऊ किंवा बहीण गरजेत आहे परंतु त्याला त्यांची दया येत नाही, तर अशा व्यक्तीमध्ये परमेश्वराची प्रीती कशी असू शकेल?

  20. प्रिय लेकरांनो, आपण शब्दांनी किंवा कोरड्या बोलण्याने प्रीती करू नये, परंतु कृतीने आणि सत्याने प्रीती करावी.

  21. परमेश्वराची प्रीती आपल्यावर आहे, ती आपण ओळखतो आणि तिच्यावर अवलंबून राहतो. परमेश्वर प्रीती आहेत. जे प्रीतीत राहतात ते परमेश्वरामध्ये राहतात आणि परमेश्वर त्यांच्यामध्ये राहतात.

  22. अशा रीतीने प्रीती आपल्यामध्ये पूर्ण होते, यासाठी की न्यायाच्या दिवशी आपल्याला असा आत्मविश्वास प्राप्त व्हावाः या जगात आपण येशू सारखे आहोत.

  23. प्रीतीमध्ये भय नसते. पूर्ण प्रीती भीतीला घालवून देते, कारण भीतीमध्ये शासन असते. जो भीती बाळगतो तो प्रीतीमध्ये पूर्ण झालेला नसतो.

  24. आम्ही त्यांच्यावर प्रीती करतो, कारण त्यांनी प्रथम आम्हावर प्रीती केली.

  25. जे कोणी परमेश्वरावर प्रीती करण्याचा दावा करतात, तरी आपल्या भावाचा किंवा बहिणीचा द्वेष करतात तर ते लबाड आहेत. कारण जर कोणी आपल्या भावाला आणि बहिणीला पाहत असूनही त्यांच्यावर प्रीती करीत नाही, तर ते परमेश्वरावर प्रीती करू शकत नाहीत, ज्यांना त्यांनी पाहिलेले नाही.