Skip to content

Kibroth-Hattaavah बद्दल बायबलमधील वचने

7 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. मग याहवेहकडून वारा वाहिला आणि समुद्रावरून लावे पक्षी आणले. आणि छावणीच्या सभोवती, एकंदर एकएक दिवसाच्या वाटेपर्यंत सर्व दिशेने सुमारे दोन हात उंचीचा थर पसरला.

  2. त्या दिवशी लोकांनी बाहेर जाऊन तो संपूर्ण दिवस आणि रात्र आणि संपूर्ण दुसरा दिवस लावे पक्षी गोळा केले. कोणीही दहा होमेर वजनापेक्षा कमी गोळा केले नाही, मग त्यांनी ते छावणीत सर्वत्र पसरून ठेवले.

  3. परंतु ते मांस त्यांच्या मुखातच होते आणि ते खाण्याच्या आधी याहवेहचा क्रोध लोकांविरुद्ध भडकला आणि याहवेहने त्यांना भयंकर पीडेने मारले.

  4. म्हणून त्या ठिकाणाचे नाव किब्रोथ-हत्ताव्वा असे पडले, कारण ज्यांनी इतर भोजनाची लालसा धरली त्या लोकांना त्या ठिकाणी पुरले.

  5. किब्रोथ-हत्ताव्वा येथून लोकांनी हसेरोथकडे प्रवास केला आणि तिथे राहिले.

  6. मग सीनायच्या रानातून निघून त्यांनी किब्रोथ-हत्ताव्वा येथे तळ दिला.

  7. नंतर त्यांनी किब्रोथ-हत्ताव्वा सोडले आणि हसेरोथ येथे तळ दिला.