Hospitality बद्दल बायबलमधील वचने: General references
General references बद्दल वचने
“ ‘तुम्ही तुमच्या देशात असलेल्या परदेश्यांचा गैरफायदा घेऊ नये. त्यांच्याशी वाईट वागू नये.
जे परदेशी तुमच्यामध्ये राहत आहेत ते तुमच्या स्वदेशीय सारखेच आहेत, असे समजून तुम्ही त्यांना वागवावे. जशी स्वतःवर तशी त्यांच्यावर प्रीती करावी, कारण तुम्हीही इजिप्त देशात विदेशी होता. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.
ते अनाथांचा व विधवांचा न्याय करतात, जे परदेशीय तुम्हामध्ये राहतात त्यांच्यावर प्रीती करून त्यांना अन्न व वस्त्रे देतात.
तुम्हीदेखील परदेशीयांवर प्रीती केली पाहिजे, कारण तुम्ही स्वतः इजिप्त देशामध्ये परदेशी होता.
तुम्ही तुमच्या सर्व उत्पन्नाचा दशांश तिसर्या वर्षी, म्हणजे दशांशाच्या वर्षी लेवी वंशजांना, परदेशी लोकांना, अनाथांना आणि विधवांना द्यावा, म्हणजे तुमच्या नगरात ते खाऊन तृप्त होतील.
मग तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर सांगावे, “मी माझ्या घरातून पवित्र हिस्सा काढला आहे. लेवी वंशजांना, परदेशीयांना, अनाथांना आणि विधवांना तुमच्या आज्ञेप्रमाणे दिला आहे. मी कोणतीही आज्ञा मोडली नाही किंवा तुमचा कोणताही नियम विसरलो नाही.
सुज्ञानाने आपले घर बांधले आहे; तिने तिचे सात खांब तयार केले आहेत.
तिने तिच्याकडील मांसाहारी भोजन आणि तिचा द्राक्षारस तयार केला आहे; तिने तिचा मेजसुद्धा सजविलेला आहे.
तिने तिच्या दासांना बाहेर पाठवले आहे आणि ती नगराच्या सर्वात उच्च स्थानावरून हाक मारते,
“जे साधे भोळे आहेत, त्या सर्वांनी माझ्या घरी यावे!” जे विवेकशून्य आहेत त्यांना ती म्हणते,
“इकडे या, माझे भोजन खा आणि मी मिसळलेला द्राक्षारस प्या.
कंजूष यजमानाचे अन्न खाऊ नकोस, त्याच्या स्वादिष्ट अन्नाची हाव धरू नकोस;
कारण तो अशा प्रकारचा व्यक्ती आहे जो नेहमीच किमतीबद्दल विचार करीत असतो. तो तुला म्हणतो “खा आणि पी” परंतु त्याचे मन तुझ्यावर नसते.
जे थोडेफार तू जेवला असशील ते ओकून टाकशील आणि तू केलेली प्रशंसा व्यर्थ होईल.
“मी निवडलेला उपास याप्रकारचा नाही का: अन्यायाची बंधने तुटली जावी आणि जोखडाचे बंद सोडावे, पीडितांना मुक्त करावे आणि प्रत्येक जोखड तोडून टाकला जावा?
भुकेल्यांना तुमच्या अन्नात तुम्ही वाटेकरी करू नये काय व निराश्रितांना आश्रय द्यावा— जेव्हा तुम्ही निर्वस्त्राला बघाल, त्याला पांघरूण घाला, आणि आपल्या रक्त व मांसाच्या बाधवांना दूर लोटावे का?
ते म्हणाले, “स्वर्गाचे राज्य, एका राजासारखे आहे ज्याने आपल्या मुलाच्या विवाह निमित्ताने मेजवानी तयार केली.
ज्यांना आमंत्रित केले होते त्या सर्वांस मेजवानीसाठी यावे म्हणून राजाने दासांना त्यांच्याकडे पाठविले. पण त्यांनी मेजवानीस येण्याचे नाकारले.
“तेव्हा त्याने आणखी काही दास पाठविले, ‘ज्यांना आमंत्रित केले आहे त्यांना सांगा की मी मेजवानी तयार केली आहे, माझे बैल आणि पुष्ट गुरे कापली आहेत आणि सर्वकाही तयार आहे. लग्नाच्या मेजवानीस या.’
“परंतु त्यांनी मुळीच लक्ष दिले नाही आणि एकजण आपल्या शेतावर, तर दुसरा आपल्या व्यापारासाठी निघून गेला.
बाकीच्या आमंत्रितांनी तर राजाच्या दासांना पकडले, अपमानित वागणूक दिली आणि ठारही मारले.
राजाला खूपच राग आला. त्याने आपले सैन्य पाठवून दासांना ठार करणार्यांचा नाश केला. त्यांची शहरे जाळून टाकली.
“यानंतर राजा आपल्या दासांना म्हणाला, ‘लग्नाची मेजवानी तयार आहे, पण ज्यांना मी आमंत्रण दिले ते लोक या बहुमानास पात्र नाहीत.
तेव्हा तुम्ही रस्त्यांच्या चौकामध्ये जा आणि तिथे जे दिसतील, त्यांना मेजवानीस घेऊन या.’
राजाच्या आज्ञेप्रमाणे दास बाहेर गेले आणि चांगले वाईट, असे जे कोणी त्यांना रस्त्यांत सापडले, त्या सर्वांना ते मेजवानीस घेऊन आले आणि मेजवानीचा कक्ष आमंत्रितांनी भरून गेला.