Skip to content

Horn बद्दल बायबलमधील वचने

43 वचने · 2 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “यानंतर रात्री मी दृष्टान्तात पाहत होतो आणि तिथे माझ्यापुढे चौथा पशू होता—तो भयंकर आणि विक्राळ आणि फार बलिष्ठ होता. त्याला मोठे लोखंडी दात होते; त्याने आपल्या काही बळींना चिरडून टाकले, काहींना फाडून खाल्ले आणि उरलेल्यांना पायाखाली तुडविले. पूर्वीच्या सर्व पशूपेक्षा हा पशू वेगळा होता. त्याला दहा शिंगे होती.

  2. “या शिंगांविषयी मी विचार करीत असता, त्या शिंगांमध्ये आणखी एक लहान शिंग उगवले आणि आधीच्या शिंगांपैकी तीन शिंगांना या नव्या शिंगाने मुळासकट उपटून टाकले. या शिंगाला माणसासारखे डोळे होते आणि बढाई करणारे तोंडही होते.

  3. “जसे मी पाहिले, “सिंहासने मांडली गेली आणि प्राचीन पुरुष आपल्या आसनावर बसला आहे. त्याची वस्त्रे हिमासारखी शुभ्र होती; त्याच्या मस्तकावरील केस लोकरीप्रमाणे पांढरे होते. त्याचे सिंहासन अग्निज्वालायुक्त होते, आणि त्याच्या सिंहासनाची चाके प्रज्वलित केलेल्या अग्नीप्रमाणे होती.

  4. अग्नीची नदी निघून वाहत होती जी त्याच्यामधून बाहेर येत होती. हजारोच्या हजार लोक त्याची सेवा करीत होते; कोट्यावधी लोक त्याच्यासमोर उभे होते. न्यायालयाचे कामकाज सुरू झाले आणि पुस्तके उघडली गेली.

  5. “मग मी सतत त्याच्याकडे पाहत होतो कारण ते शिंग फुशारकीचे शब्द बोलत होते. मी सतत पाहत राहिलो जोपर्यंत चौथ्या पशूचे वध करण्यात आले नाही आणि त्याचे शरीर अग्निज्वालांमध्ये फेकण्यात आले नाही.

  6. (इतर पशूंचे अधिकार काढून घेण्यात आले, परंतु त्यांना आणखी काही काळ जिवंत राहण्याची परवानगी देण्यात आली.)

  7. “नंतर रात्री दृष्टान्तात पाहत होतो आणि मी पाहिले, मानवपुत्रासारखा आकाशात मेघारूढ होऊन येत असलेला दिसला. तो प्राचीन पुरुषाकडे गेला आणि त्याच्या उपस्थितीत त्याला सादर करण्यात आले.

  8. त्याला अधिकार, गौरव व सार्वभौम सामर्थ्य देण्यात आले; सर्व राष्ट्रांनी आणि प्रत्येक सर्व भाषा बोलणार्‍यांनी त्याची उपासना केली. त्याचे सामर्थ्य शाश्वतचे आहे, जे कधीही ढळणार नाही आणि त्याचा कधी अंत होत नाही आणि म्हणून त्याचे राज्य हे असे राज्य आहे, ज्याचा कधीही नाश होणार नाही.

  9. “मी, दानीएल, माझ्या आत्म्यात खूप व्यथित झालो आणि मी माझ्या मनात जो दृष्टान्त पाहिला, त्यामुळे मी गोंधळून गेलो.

  10. मी तिथे उभ्या असलेल्यांपैकी एकाकडे गेलो आणि मी त्याला या सर्व गोष्टींचा अर्थ काय हे विचारले. “मग त्याने मला सांगितले व गोष्टींचा अर्थ समजावून सांगितला:

  11. ‘हे चार महाकाय पशू म्हणजे पृथ्वीवर उदय पावणारे चार राजे आहेत.

  12. तरी परमोच्च परमेश्वराच्या पवित्र जणांना राज्य मिळेल आणि ते सदासर्वकाळ त्याच्या ताब्यात राहतील—होय, सदासर्वकाळ.’

  13. “मग मला चौथ्या प्राण्याचा अर्थ जाणून घ्यायचा होता, जो इतर सर्व पशूंपेक्षा वेगळा होता. तो आपल्या लोखंडी दातांनी आणि कास्याच्या नखांमुळे अति भयानक होता—त्याने आपल्या काही बळींना चिरडून टाकले, काहींना फाडून खाल्ले आणि उरलेल्यांना पायाखाली तुडविले.

  14. मला हे देखील जाणून घ्यायचे होते की त्याच्या डोक्यावर असलेली दहा शिंगे आणि दुसरे शिंग जे बाहेर आले, त्यापैकी तीन शिंगे बाहेर आल्यावर पडली. मला त्या दहा शिंगांविषयी आणि जे शिंग नंतर आले, ज्याच्या येण्याने तेथील तीन शिंगे तुटून पडली—ते शिंग जे इतरांपेक्षा अधिक आकर्षक दिसले आणि ज्याला डोळे होते व फुशारकी मारणारे बढाईखोर तोंड होते, मला हे जाणून घ्यायचे होते.

  15. मी पाहिले की, हे शिंग पवित्र लोकांशी युद्ध करीत आहे आणि त्यांचा पराभव करीत राहिले,

  16. जोपर्यंत सनातन पुरुष येईपर्यंत आणि परमोच्च परमेश्वराच्या पवित्र लोकांच्या बाजूने निर्णय घोषित होईपर्यंत, त्यांनी राज्य ताब्यात घेण्याची वेळ आली.

  17. “त्याने मला हे स्पष्टीकरण दिले: ‘हा चौथा पशू म्हणजे हे चौथे राज्य होईल जे पृथ्वीवर प्रकट होईल. ते सर्व राज्याहून निराळे होईल आणि ते संपूर्ण पृथ्वीला गिळंकृत करेल, तिला तुडवून टाकेल, आणि तिचे तुकडे करेल.

  18. ती दहा शिंगे म्हणजे दहा राजे. जे या राज्यातून येतील. यानंतर आणखी एक राजा येईल, जो आधीच्या राजांपेक्षा भिन्न असणार; तो या तिघांना वश करेल.

  19. मी आपले डोळे वर करून पाहिले की नदीच्या काठावर उभा असलेला एक मेंढा दिसला, त्याला दोन शिंगे होती आणि ती शिंगे लांब होती. एक शिंग दुसर्‍यापेक्षा अधिक लांब होते परंतु नंतर ते वाढले.

  20. मी पाहिले की तो मेंढा पश्चिमेकडे, उत्तरेकडे, आणि दक्षिणेकडे धडक मारीत होता. दुसर्‍या कोणताही प्राणी त्याच्यासमोर उभा राहू शकला नाही आणि त्याच्या सामर्थ्यापासून वाचू शकला नाही. त्याला ज्यात संतोष वाटला, ते त्याने केले आणि तो महान झाला.

  21. जेव्हा मी याचा विचार करीत होतो, तेव्हा मी पाहिले की एक बोकड त्याचे पाय जमिनीवर ठरत नव्हते, जो सर्व पृथ्वीला पार करून आला. या बोकडाला डोळ्यांच्या मधोमध एक ठळक शिंग होते.

  22. तो दोन शिंगे असलेल्या मेंढ्याजवळ आला जो नदीसमोर उभा होता आणि पूर्णशक्तीने त्याने त्यावर हल्ला केला.

  23. मी पाहिले की त्याने फार क्रोधित होऊन मेंढ्यावर हल्ला केला आणि धडक देत त्याचा दोन्ही शिंगांना मोडून टाकले. मेंढा त्याच्या विरोधात उभा राहण्यास शक्तिहीन होता; बोकडाने त्याला जमिनीवर आपटले आणि पायाखाली तुडविले आणि त्याच्या शक्तीपासून मेंढ्याला कोणालाही सोडविता आले नाही.

  24. तो बोकड फार महान झाला, परंतु तो बलिष्ठ झाल्यामुळे त्याचे मोठे शिंग मोडले आणि त्या शिंगाच्या जागी चार ठळक शिंगे फुटली. त्यांची टोके चारही दिशांनी वाढली.

  25. त्यांच्यापैकी एकामधून दुसरे शिंग फुटले, लहान म्हणून त्याचा प्रारंभ झाला, परंतु दक्षिण, पूर्व आणि वैभवी देशाच्या दिशेने मोठ्या प्रमाणात वाढले.