Skip to content

Fool बद्दल बायबलमधील वचने

36 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जसे दारुड्याच्या हातात काटेरी झाडाची फांदी, तसेच मूर्खाच्या मुखात नीतिवचने.

  2. जो मूर्खाला किंवा जवळून जाणार्‍या कोणा अनोळखीलाही कामावर ठेवतो. तो नेम न धरता कोणालाही जखम करणार्‍या धनुर्धारीसारखा आहे.

  3. जसा कुत्रा त्याच्या ओकारीकडे परत जातो तसाच मूर्ख पुन्हापुन्हा मूर्खपणा करतो.

  4. आपल्याच दृष्टीत स्वतःला शहाणा समजणारा मनुष्य तुम्ही पाहिला आहे काय? अशा माणसापेक्षा मूर्खाला अधिक आशा आहे.

  5. साप वश होण्यापूर्वी जर गारुड्याला चावला, तर गारुड्याला त्याचा काही उपयोग नाही.

  6. सुज्ञ व्यक्तीच्या मुखातील शब्द कृपेचे असतात, पण मूर्खाचे ओठ त्याचाच नाश करतात.

  7. त्यांचे बोलणे प्रथम मूर्खतेचे असते; आणि त्यांच्या बोलण्याचा शेवट दुष्टाईच्या वेडेपणाने होतो;

  8. मूर्ख शब्द वाढवून बोलतात. पुढे काय घडणार ते कोणी जाणत नाही; त्यांच्यानंतर काय होणार असे एखाद्याला कोणी व्यक्ती सांगू शकणार काय?

  9. मूर्खांचे श्रम त्यांना थकवून टाकतात; नगराकडे जाणारी वाट त्यांना ठाऊक नसते.

  10. जो कोणी माझी वचने ऐकतो पण ती आपल्या आचरणात आणत नाही, तो पाया न घालता आपले घर वाळूवर बांधण्यार्‍या मूर्ख माणसासारखा आहे.

  11. मग पाऊस पडला, पूर आला, वारेही सुटले आणि त्या घरावर जोराने आदळले आणि ते घर कोसळून पडले.”