Daily Offering बद्दल बायबलमधील वचने: Sacrificial
Sacrificial बद्दल वचने
“दररोज तू वेदीवर जे अर्पण करावयाचे आहे ते हे: एक वर्षाची दोन कोकरे.
एक कोकरू सकाळी व दुसरे संध्याकाळी अर्पण करावे.
पहिल्या कोकराबरोबर कुटून काढलेल्या जैतुनाच्या एक पाव हीन तेलात मळलेल्या पिठाचा एक एफाचा दहावा भाग आणि पेयार्पण म्हणून एक पाव हीन द्राक्षारस अर्पण करावे.
संध्याकाळी दुसरे कोकरू सकाळच्या अर्पणाप्रमाणे धान्यार्पण व पेयार्पण यासहित अर्पण करावे. हे अन्नार्पण याहवेहसाठी सुवासिक अर्पण आहे.
“हे होमार्पण येणार्या पिढ्यान् पिढ्या पर्यंत, याहवेहसाठी सभामंडपाच्या प्रवेशद्वारात नित्य करावे. तिथे मी तुला भेटेन व तुझ्याशी बोलेन.
“रोज सकाळी जेव्हा अहरोन दिव्याची तयारी करेल, त्यावेळी त्याने वेदीवर सुगंधी धूप जाळावा.
पुन्हा सायंकाळी दिवे लावायला तो येईल तेव्हा त्याने धूप जाळावा म्हणजे याहवेहसमोर नित्याने येणार्या पिढ्यांपर्यंत धूप जळत असावा.
या वेदीवर इतर कोणताही धूप, होमार्पण, अन्नार्पण किंवा पेयार्पण करू नये.
त्यांना सांग: ‘जे अन्नार्पण तुम्ही याहवेहला सादर करावे ते हे: एक वर्षाची दोन निर्दोष कोकरे, जी दररोज नियमितपणे होमार्पण म्हणून अर्पण करावी.
एक कोकरू सकाळी व दुसरे संध्याकाळी अर्पण करावे.
त्याबरोबर धान्यार्पणासाठी एक एफाचा दहावा भाग बारीक पीठ, कुटून काढलेल्या एक पाव हीन जैतुनाच्या तेलात मळून अर्पण करावे.
सीनाय पर्वतावर स्थापित केलेले हे नियमितपणाचे होमार्पण याहवेहला आवडणारे सुवासिक अन्नार्पण आहे.
त्याबरोबरचे पेयार्पण, एका कोकर्याबरोबर एक पाव आंबवलेले पेय असावे. हे पेयार्पण याहवेहसाठी पवित्रस्थानी ओतावे.
दुसरे कोकरू संध्याकाळी अर्पावे, सकाळच्या अर्पणाप्रमाणे धान्यार्पण व पेयार्पण यासहित अर्पण करावे. हे अन्नार्पण याहवेहसाठी सुवासिक अर्पण आहे.’ ”
मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्यांनी मंडपांचा सण पाळला व सणाच्या नियमानुसार प्रतिदिवसासाठी नेमलेले होमबली प्रत्येक दिवशी अर्पिले.
याशिवाय नेहमीचे होमबली आणि चंद्रदर्शनाचे व सर्व सणांचे बली, तसेच याहवेहच्या इतर वार्षिक उत्सवांचे बली व लोकांनी याहवेहसाठी स्वखुशीने आणलेले बली त्यांनी अर्पण केले.
याहवेहच्या मंदिराचा पाया अद्याप घातला गेला नव्हता, तरी सातव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी याहवेहला होमार्पणे करण्यास सुरुवात केली.
“ ‘तुम्ही दररोज एक वर्षाचे निर्दोष कोकरू होमार्पण म्हणून याहवेहला अर्पण करावे; तुम्ही ते दररोज सकाळी करावे.
तसेच त्याबरोबर रोज सकाळी एका एफाहचा सहावा भाग व पीठ भिजवण्यासाठी हिनाचा तिसरा भाग धान्यार्पण म्हणून आणावे. याहवेहसमोर हे धान्यार्पण सादर करण्याचा नियम सर्वकाळासाठी असावा.
याप्रमाणे दररोज सकाळी नियमित होमार्पणासाठी कोकरू आणि धान्यार्पण आणि तेल आणावे.
बासष्ट ‘सप्तके’ हा काळ संपल्यावर अभिषिक्ताचा वध करण्यात येईल आणि त्याला काही उरणार नाही. मग अधिपतीचे लोक शहराचा आणि पवित्रस्थानाचा विध्वंस करतील. शेवट महापुराप्रमाणे येईल: शेवट होईपर्यंत युद्ध चालू राहील आणि सर्वकाही ओसाड व्हावे असे ठरले आहे.
तो एका ‘सप्तका’ साठी अनेकांसोबत कराराची पुष्टी करेल. ‘सप्तका’ मध्ये, यज्ञ करण्यास व अन्नार्पणे वाहण्याचे बंद करेल. आणि मंदिरात अमंगळ वस्तू स्थापित करेल, ज्यामुळे ओसाडी पडेल. नेमलेल्या समाप्तीपर्यंत सर्वनाश करणार्यावर कोपाचा वर्षाव होईल.”