Skip to content

Curtains बद्दल बायबलमधील वचने: For tabernacle

21 वचने · 3 पैलू

For tabernacle बद्दल वचने

  1. “निवासमंडपासाठी अंगण बनवावे. त्याची दक्षिणेकडील बाजू शंभर हात लांब असावी व त्यास कातलेल्या रेशमी तागाचे पडदे असावेत,

  2. आणि वीस खांब व वीस कास्याच्या बैठका बनवाव्या, खांबावर चांदीच्या कड्या व पट्ट्या असाव्या.

  3. उत्तरेकडील बाजू सुद्धा शंभर हात लांब असून तिलाही पडदे आणि वीस खांब व कास्याच्या वीस बैठका बनवाव्या, खांबाच्या कड्या व पट्ट्या चांदीच्या असाव्या.

  4. “अंगणाच्या पश्चिमेकडील बाजू पन्नास हात रुंदीची असावी व त्यासाठी पडदे, व दहा खांब व दहा बैठका असाव्या.

  5. सूर्योदयाकडील पूर्वेकडील अंगण सुद्धा पन्नास हात रुंद असावे.

  6. प्रवेशद्वाराच्या एका बाजूस पंधरा हात लांबीचा पडदा आणि तीन खांब व तीन बैठका असाव्या.

  7. आणि दुसर्‍या बाजूला पंधरा हात लांबीचे पडदे, तीन खांब व तीन बैठका असाव्या.

  8. “अंगणाच्या प्रवेशद्वारासाठी, निळ्या जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचे व रेशमी तागाचा, वीस हात लांबीचा पडदा असावा; त्यावर भरतकाम केलेले असावे; त्यात चार खांब व चार बैठका असाव्या.

  9. अंगणाच्या सभोवती असलेल्या सर्व खांबांना चांदीच्या पट्ट्या, कड्या व कास्याच्या बैठकी असाव्या.

  10. अंगणाची लांबी शंभर हात, रुंदी पन्नास हात असावी व त्यास कातलेल्या रेशमी तागाचे पाच हात उंचीचे पडदे आणि कास्याच्या बैठकी असाव्या.

  11. सर्व कुशल कारागिरांनी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगांच्या तागाच्या व रेशमी तागाच्या दहा पडद्यांनी निवासमंडप तयार केला व त्यावर कुशल कारागिरांकडून करूब विणून घेतले.

  12. सर्व पडद्यांची लांबी अठ्ठावीस हात व रुंदी चार हात होती.

  13. त्यांनी पाच पडदे एकमेकांना जोडले व इतर पाच पडद्यांचेही तसेच केले.

  14. जोडलेल्या पडद्यापैकी शेवटच्या पडद्यांच्या किनारीवर त्यांनी निळ्या रंगाच्या कापडाचे फासे बनविले आणि दुसर्‍या पडद्यांच्या शेवटच्या पडद्यालाही तसेच केले.

  15. तसेच त्यांनी एका पडद्याच्या किनारीला पन्नास फासे व दुसर्‍या पडद्याच्या किनारीपर्यंत तसेच पन्नास फासे केले, हे फासे समोरासमोर होते.

  16. मग त्यांनी सोन्याचे पन्नास आकडे तयार केले आणि त्याचा उपयोग पडद्याच्या दोन जोड्या एकत्र बांधण्यासाठी केला, यासाठी की निवासमंडप अखंड होईल.

  17. निवासमंडपावर आच्छादन करण्यासाठी त्यांनी बोकडाच्या केसाचे पडदे तयार केले; ते अकरा पडदे होते.

  18. सर्व अकरा पडदे एकाच मापाचे, म्हणजे लांबी तीस हात व रुंदी चार हात होती.

  19. त्यांनी पाच पडदे एकत्र जोडले आणि इतर सहा पडदे एकत्र जोडले.

  20. जोडलेल्या पडद्यांपैकी शेवटच्या पडद्याच्या किनारीवर पन्नास फासे करून तो एकजोड केला आणि दुसर्‍या पडद्याच्या किनारीवर देखील पन्नास फासे करून एकजोड केला.

  21. मग त्यांनी कास्याचे पन्नास आकडे तयार केले आणि ते फासात घालून तंबू एकजोड केला.