मुख्य मजकुरावर जा

Claudius Lysias बद्दल बायबलमधील वचने: A Roman military officer

18 वचने · 2 पैलू

"Claudius Lysias" साठी शोधा

A Roman military officer बद्दल वचने

  1. ते त्याला ठार करण्याच्या विचारात होते, एवढ्यात रोमी लष्करी ठाण्याच्या सेनापतीकडे बातमी गेली की सर्व यरुशलेममध्ये गोंधळ माजला आहे.

  2. तेव्हा तो त्वरित आपल्या सैनिकांना व अधिकार्‍यांना घेऊन धावत समुदायाकडे गेला. मारणार्‍यांनी सेनापतीला व फौजेला येताना पाहिल्याबरोबर पौलाला फटके मारण्याचे थांबविले.

  3. सेनापतीने येऊन त्याला अटक केली आणि दोन साखळ्यांनी त्याला बांधण्यात यावे अशी आज्ञा केली. नंतर त्याने तो कोण होता आणि त्याने काय केले होते याची चौकशी केली.

  4. तेव्हा समुदायातील काही लोक एक आणि इतर दुसरे काहीतरी म्हणत होते. या गलबल्यामुळे सेनापतीला खरे ते काही कळेना, म्हणून त्याने पौलाला बराकीत नेण्याचा हुकूम दिला.

  5. पौल पायर्‍यांपर्यंत पोहोचला, त्यावेळी लोकांची हिंसा एवढी वाढली की होती की सैनिकांना त्याला उचलून न्यावे लागले.

  6. त्याच्यामागे चालत येणारा लोकसमुदाय सारखा ओरडत होता, “याची विल्हेवाट लावा!”

  7. पौलाला सैनिक आता बराकीत नेणार, एवढ्यात तो सेनापतीला म्हणाला, “मी आपल्याबरोबर काही बोलू शकतो काय?” त्याने त्याला विचारले. “तुला ग्रीक भाषा येते काय?

  8. ज्या इजिप्तच्या मनुष्याने थोड्या दिवसांपूर्वी बंड उठवून चार हजार दहशतवाद्यांस रानात नेले होते, तो तूच आहेस नाही का?”

  9. पौलाने उत्तर दिले, “मी यहूदी आहे व किलिकियातील तार्सस शहराचा नागरिक असून, माझे शहर सर्वसामान्य नाही. कृपा करून या लोकांबरोबर मला बोलू द्यावे.”

  10. सेनापतीची परवानगी मिळाल्यावर, पौल पायर्‍यांवर उभा राहिला आणि लोकांनी शांत राहवे, असे त्याने हाताने खुणावले. ते सर्व शांत झाल्यावर, तो इब्री भाषेत म्हणाला:

  11. ते ओरडत होते, आपले अंगरखे वर हवेत फेकीत होते व धूळ आकाशात उधळीत होते,

  12. तेव्हा सेनापतीने पौलाला आत बराकीत आणण्याची आज्ञा केली. लोक त्याच्यावर इतके का ओरडत आहेत, हे समजावे म्हणून त्याने फटके मारून त्याची चौकशी करण्यास सांगितले.

  13. जेव्हा ते पौलाला फटके मारण्यासाठी बांधत होते त्यावेळेस पौल तिथे उभा असलेल्या शताधिपतीला म्हणाला, “ज्या मनुष्यावर दोषारोप अजून सिद्ध झालेला नाही, अशा रोमी नागरिकाला फटके मारणे हे कायद्याने योग्य आहे का?”

  14. ते ऐकल्याबरोबर तो अधिकारी शताधिपती सेनापतीकडे गेला व म्हणाला, “आपण काय करत आहात? हा मनुष्य तर रोमी नागरिक आहे.”

  15. तेव्हा तो सेनापती पौलाकडे गेला आणि त्याने त्याला विचारले, “मला सांग, तू रोमी नागरिक आहेस काय?” त्याने उत्तर दिले. “होय, मी आहे.”

  16. त्यावर तो सेनापती बोलला, “मला नागरिकत्व मिळण्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागले.” “परंतु मी जन्मतःच रोमी नागरिक आहे,” पौलाने उत्तर दिले.

  17. यामुळे जे त्याला प्रश्न विचारून त्याची चौकशी करणार होते ते तत्काळ निघून गेले. सेनापतीला जेव्हा समजले की, पौल एक रोमी नागरिक आहे आणि त्याचा आरोप सिद्ध होण्यापूर्वी त्याला साखळदंडानी बांधले गेले होते, तो फार घाबरून गेला.

  18. सेनापतीला हे शोधून काढायचे होते की, खरोखर कोणत्या कारणाने यहूदी लोक पौलाला आरोपी ठरवीत आहेत. म्हणून त्याने दुसर्‍या दिवशी पौलाला मुक्त केले आणि मुख्य याजक व सर्व न्यायसभेचे सभासद यांना एकत्र होण्याचा हुकूम केला. त्यांनी पौलाला न्यायसभेपुढे आणून उभे केले.