मुख्य मजकुरावर जा

Church of Israel बद्दल बायबलमधील वचने: A spiritual church within it

9 वचने · 30 पैलू

A spiritual church within it बद्दल वचने

  1. तर असे नाही की परमेश्वराचे वचन अयशस्वी ठरले. इस्राएल वंशातून आलेला प्रत्येकजण इस्राएली असेल असे नाही.

  2. कारण त्याचे वंशज आहेत म्हणून ते सर्व अब्राहामाची मुले आहेत असे नाही. याउलट, “इसहाकाद्वारेच तुझी संतती वाढेल.”

  3. याचा अर्थ असा की शारीरिक रीतीने जन्मलेली मुले ही परमेश्वराची मुले नाहीत, जी अभिवचनानुसार जन्मलेली लेकरे, तीच अब्राहामाची मुले गणली जातील.

  4. ज्यांच्याविषयी पूर्वज्ञान होते अशा आपल्या लोकांचा परमेश्वराने त्याग केला नाही. वचनामध्ये एका भागात एलीयाहबद्दल म्हटले, ते तुम्हाला माहीत नाही का—इस्राएलविरुद्ध परमेश्वराजवळ त्याने कशी विनंती केली:

  5. “प्रभू, त्यांनी तुमच्या संदेष्ट्यांना मारून टाकले आहे, आणि तुमच्या वेद्या फोडल्या आहेत; मी एकटाच उरलो आहे, आणि आता ते मला सुद्धा मारण्याचा प्रयत्न करीत आहेत.”

  6. यावर परमेश्वराचे त्याला काय उत्तर होते? “मी माझ्याकरिता सात हजार लोक राखून ठेवले आहेत आणि ज्यांनी बआलच्या पुढे गुडघे टेकले नाहीत.”

  7. वर्तमान काळीही असेच आहे. काही अवशिष्ट जण कृपेने निवडलेले आहेत,

  8. आणि जर हे कृपेने आहे, तर कर्मावर आधारित होऊ शकत नाही. तसे असते, तर कृपा ही यापुढे कृपा राहणार नाही.

  9. मग काय? इस्राएली लोकांनी जे झटून शोधले ते त्यांना मिळालेले नाही. जे निवडलेले होते त्यांना मिळाले, पण इतरजण कठीण झाले,