Skip to content

Cedar बद्दल बायबलमधील वचने

11 वचने · 9 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. मग त्याने दोन पक्षी, गंधसरूचे लाकूड, किरमिजी रंगाची दोरी व एजोब घेऊन शुद्धीकरणाचा विधी करावा.

  2. त्याने वाहत्या पाण्याच्या वर मातीचे पात्र धरून त्याच्यात एक पक्षी मारावे,

  3. व वाहत्या पाण्यावर धरलेल्या मातीच्या पात्रात मारलेल्या पक्ष्याच्या रक्तात, तसेच वाहत्या पाण्यात, गंधसरूचे लाकूड, किरमिजी रंगाची दोरी, एजोब त्याचप्रमाणे दुसरा जिवंत पक्षी बुडवावा, आणि ते रक्त सात वेळा त्या घरावर शिंपडावे. अशाप्रकारे याजक ते घर शुद्ध करेल.

  4. And he shall cleanse the house with the blood of the bird, and with the running water, and with the living bird, and with the cedar wood, and with the hyssop, and with the scarlet:

  5. “तर आता लबानोनचे गंधसरू माझ्यासाठी कापले जावे अशी आज्ञा करा. माझी माणसे तुमच्या माणसांबरोबर काम करतील आणि तुमच्या माणसांसाठी तुम्ही जी मजुरी ठरवाल ती मी तुम्हाला देईन. तुम्हाला माहीतच आहे की लाकडाचे काम करण्यात जी निपुणता सीदोनी लोकांमध्ये आहे ती आमच्यात कोणामध्ये नाही.”

  6. शलोमोनचा निरोप ऐकून हीरामाला अतिशय आनंद झाला व म्हणाला, “आज याहवेहची स्तुती असो, कारण या महान देशावर राज्य करण्यासाठी याहवेहने दावीदाला ज्ञानी पुत्र दिला आहे.”

  7. तेव्हा हीरामाने शलोमोनला निरोप पाठवला: “आपण पाठविलेला निरोप मला मिळाला. देवदारू व गंधसरूच्या लाकडाचा पुरवठा आपल्या मागणीनुसार पुरविला जाईल.

  8. माझी माणसे ती लबानोनपासून भूमध्य समुद्रापर्यंत ओढून नेतील, मी त्यांचे ताफे बनवून जे ठिकाण आपण मला सांगाल तिथपर्यंत पोचते करेन. तिथे मी ते वेगळे करेन आणि मग आपण ते घेऊन जाऊ शकता. आणि माझ्या राजकीय घराण्याला आपण अन्न पुरवावे ही माझी इच्छा आपण पूर्ण करावी.”

  9. याप्रकारे हीरामाने शलोमोनला हवे तेवढ्या गंधसरू आणि देवदारू लाकडांचा पुरवठा केला.

  10. शलोमोनाने सोरचा राजा हीराम याच्याकडे हा निरोप पाठविला: “माझे पिता दावीद यांना महाल बांधण्यासाठी पाठविले त्याप्रमाणे मलाही गंधसरूचे लाकूड पाठवावे.

  11. आता मी याहवेह माझे परमेश्वराच्या नामाने मंदिर बांधण्याचे आणि ते त्यांना समर्पित करण्याचे ठरविले आहे. त्यांच्या पुढे सुगंधी धूप जाळण्याचे, समर्पित भाकर तिथे नित्यनेमाने ठेवण्याचे आणि प्रतिदिनी सकाळ व सायंकाळी, तसेच शब्बाथ, चंद्रदर्शन उत्सव व याहवेह आमच्या परमेश्वरास होमार्पणे सादर करण्याचे योजले आहे. कारण हे सर्वकाळासाठी इस्राएलास नेमलेले नियम आहेत.