Skip to content

Burial बद्दल बायबलमधील वचने: Soon after death

7 वचने · 56 पैलू

Soon after death बद्दल वचने

  1. त्यानंतर अरिमथियाकर योसेफाने येशूंचे शरीर पिलाताकडे मागितले. आता योसेफ येशूंचा एक गुप्त अनुयायी असून यहूदी पुढार्‍यांना भीत होता. पिलाताच्या परवानगीने, तो आला आणि येशूंचे शरीर घेऊन गेला.

  2. जो येशूंकडे रात्री आलेला होता, तो निकदेमही त्याच्याबरोबर होता व त्याने आपल्याबरोबर गंधरस व अगरू यांचे सुमारे चौतीस कि.ग्रॅ. मिश्रण आणले होते.

  3. येशूंचे शरीर घेऊन त्या दोघांनी ते सुगंधी द्रव्यासह तागाच्या वस्त्राने गुंडाळले. हे यहूद्यांच्या उत्तरक्रियेच्या रीतीप्रमाणे होते.

  4. ज्या ठिकाणी येशूंना क्रूसावर खिळले होते त्या ठिकाणी एक बाग होती आणि त्या बागेत एक नवीन कबर होती, त्यामध्ये आतापर्यंत कोणालाही ठेवले नव्हते.

  5. शब्बाथ सुरू होण्यापूर्वी सर्वकाही उरकण्याची घाई होती व ही कबर जवळच होती, म्हणून त्यांनी येशूंचे शरीर त्याच कबरेत ठेवले.

  6. मग पेत्र तिला म्हणाला, “प्रभूच्या आत्म्याची परीक्षा पाहण्यासाठी तुम्ही कट का केला? ऐक, ज्या पुरुषांनी तुझ्या पतीला नुकतेच पुरले आहे त्यांचे पाय दारातच आहेत आणि ते तुलादेखील उचलून बाहेर नेतील.”

  7. त्याच क्षणी ती त्याच्या पायावर कोसळली आणि मरण पावली आणि ते तरुण आत आले व तिचा मृत्यू झाल्याचे पाहून तिला बाहेर नेऊन तिच्या नवर्‍याजवळ पुरले.