Skip to content

Bride बद्दल बायबलमधील वचने

17 वचने · 4 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. अगे कन्ये, ऐक, काळजीपूर्वक लक्ष दे; तू आपली माणसे आणि आपल्या पित्याचे घर विसर.

  2. तेव्हा राजा तुझ्या सौंदर्यात आनंद करेल; त्याचा आदर कर, कारण तो तुझा स्वामी आहे.

  3. सोराची कन्या नजराणे घेऊन येईल, श्रीमंत लोक तुमची कृपा लाभावी म्हणून इच्छा करतील.

  4. राजकन्या, आपल्या अंतःपुरात तेजस्वी आहे; तिची भरजरी वस्त्रे सोन्याच्या धाग्यांनी विणलेली आहे.

  5. नक्षीदार वस्त्रांनी नटवून तुला राजाकडे नेण्यात येत आहे; तिच्या कुमारी सख्या तिच्या मागोमाग चालल्या आहेत— त्यांना तुझ्याकडे आणण्यात येत आहे.

  6. राजमहालात प्रवेश करीत असताना, त्यांची मिरवणूक किती आल्हाददायक आणि हर्षपूर्ण वाटते.

  7. तुझे पुत्र आपल्या पित्याप्रमाणे राजे होतील, जगातील सर्व सिंहासनावर ते बसतील.

  8. सर्व पिढ्यांमध्ये तुझ्या नावाचे स्मरण होईल, असे मी करेन; जगातील राष्ट्रे सर्वकाळ तुझी स्तुती करतील.

  9. “ ‘नंतर मी तिथून गेलो आणि जेव्हा मी तुला पाहिले आणि मला दिसले की तू प्रीती करण्याच्या वयात आली होतीस, तेव्हा मी आपल्या वस्त्राचा कोपरा तुझ्यावर पसरून तुझे नग्न शरीर झाकले. तुला मी आपली पवित्र शपथ देऊन तुझ्याशी करार केला आणि तू माझी झालीस, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

  10. “ ‘पाण्याने तुला स्नान करवून तुझ्यावरील रक्त मी धुऊन टाकले आणि तुला तेल लावले.

  11. तुला मी नक्षीकाम केलेली वस्त्रे घातली आणि उत्तम चामड्याची पायतणे चढविली. तुझ्यावर मी उत्तम रेशमी कपडे व भरजरी वस्त्रे पांघरली.

  12. मी तुला दागिन्यांनी सजविले: मी तुझ्या हातांवर बांगड्या व गळ्यात साखळी घातली,

  13. आणि मी तुझ्या नाकात नथ, कानात कुंडली आणि तुझ्या डोक्यावर एक सुंदर मुकुट घातला.

  14. याप्रकारे तू सोन्या-चांदीने नटली; तुझी वस्त्रे रेशमी आणि किमती व नक्षीकाम केलेले सुंदर तुझे कपडे होते. मध, जैतुनाचे तेल आणि सपीठ तुझे अन्न होते. तू अति सुंदर होऊन राणी होण्यास योग्य झालीस.

  15. तुझ्या सौंदर्यामुळे तुझी किर्ती अनेक देशांत पसरली, कारण मी तुला दिलेल्या वैभवाने तुझे सौंदर्य परिपूर्ण झाले होते, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

  16. चला, आपण आनंदोत्सव करू, उल्लास करू व त्यांचे गौरव करू, कारण कोकर्‍याच्या विवाहाची वेळ झाली आहे. त्यांच्या वधूने स्वतःला सजविले आहे.

  17. तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र परिधान करावयास दिले आहे,” ते तागाचे तलम वस्त्र म्हणजे पवित्र लोकांची नीतिकृत्ये आहेत.