Skip to content

Bereavement बद्दल बायबलमधील वचने

18 वचने · 4 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. त्याने उत्तर दिले, “मूल अजून जिवंत होते तेव्हा मी उपास केला आणि रडलो, मला वाटले, ‘न जाणो याहवेहची कृपा कदाचित माझ्यावर होईल आणि ते मुलाला वाचवतील.’

  2. परंतु आता तो मरण पावला आहे, तर मी उपास का करावा? मी त्याला पुन्हा परत आणू शकणार आहे काय? मी त्याच्याकडे जाईन, परंतु तो माझ्याकडे परत येणार नाही.”

  3. तो बोलतच असताना, आणखी एक निरोप्या आला व म्हणाला, “तुमचे पुत्र आणि कन्या त्यांच्या वडील भावाच्या घरी मेजवानी करीत आणि द्राक्षारस पीत असता,

  4. वाळवंटातून अचानक प्रचंड वारा आला आणि त्या घराचे चारही कोपरे हादरले. त्यामुळे ते घर त्यांच्यावर कोसळले आणि ते मरण पावले; हे तुम्हाला सांगायला मीच एकटा सुटून आलो आहे!”

  5. हे ऐकताच इय्योब उठला आणि त्याने आपला झगा फाडला आणि डोक्यावरून वस्तरा फिरविला. नंतर जमिनीवर पडून त्याने उपासना केली

  6. आणि म्हणाला: “आईच्या उदरातून मी नग्न आलो, आणि नग्नच मी परत जाईन, याहवेहने दिले आणि याहवेहने परत घेतले; त्या याहवेहचे नाव धन्यवादित असो.”

  7. मेजवानीच्या घरी जाण्यापेक्षा शोकाकुल घरात जाणे हे अधिक उत्तम आहे, प्रत्येक मनुष्याने ही गोष्ट लक्षात ठेवावी; मृत्यू हे सर्वांचे विधिलिखित आहे.

  8. विलाप करणे हे हसण्यापेक्षा बरे, कारण दुःखी चेहरा हृदयासाठी बरा आहे.

  9. सुज्ञानी मनुष्याचे हृदय शोकाकुल घरात असते, परंतु मूर्खांचे हृदय सुखाच्या घरात असते.

  10. “हे मानवपुत्रा, एका झटक्यात तुझ्या डोळ्याचा आनंद मी तुझ्यापासून काढून घेणार आहे. परंतु तू शोक करू नकोस किंवा रडू नकोस वा अश्रू गाळू नकोस.

  11. शांततेने कण्ह; मेलेल्यासाठी शोक करू नकोस. तुझा पागोटा काढू नकोस आणि आपली पायतणे पायातच असू दे; तुझे तोंड झाकू नकोस किंवा प्रथेनुसार शोक करणार्‍यांसाठी आणलेले अन्न तू खाऊ नकोस.”

  12. म्हणून सकाळी मी लोकांशी बोललो आणि संध्याकाळी माझी पत्नी मरण पावली. दुसर्‍या सकाळी मला आज्ञापिल्याप्रमाणे मी केले.

  13. बंधू आणि भगिनींनो, जे मरणामध्ये झोपी गेले आहेत, त्यांच्याविषयी तुम्ही अजाण नसावे, अशी आमची इच्छा आहे, यासाठी की ज्यांना आशा नाही अशा इतर मनुष्यासारखा आपण खेद करू नये.

  14. कारण येशू मरण पावले आणि पुन्हा जिवंत झाले, असा आपला विश्वास आहे, त्याअर्थी येशूंमध्ये झोपी गेले आहेत त्यांना परमेश्वर माघारी आणतील यावर आपण विश्वास ठेवतो.

  15. स्वतः प्रभू येशूंच्या वचनाप्रमाणे मी तुम्हाला सांगतो की आपण जे जिवंत आहोत आणि प्रभूच्या आगमनासमयी जिवंत असू, ते प्रभूला भेटण्यासाठी, जे आपल्यापूर्वी मरण पावले आहेत, त्यांच्या आधी, वर घेतले जाणार नाही.

  16. कारण प्रभू स्वतःच आज्ञा करणार्‍या मोठ्या ध्वनीने, प्रधान दूताच्या वाणीने आणि परमेश्वराच्या तुतारीच्या आवाजाने स्वर्गातून खाली उतरतील. मग ख्रिस्तामध्ये जे मरण पावले आहेत, ते प्रथम उठतील.

  17. त्यानंतर, जे आपण अजून जिवंत आहोत आणि मागे राहिलेले आहोत, असे सर्वजण मेघारूढ होऊन प्रभूला भेटण्यासाठी अंतराळात घेतले जाऊ आणि प्रभूजवळ सदासर्वकाळ राहू.

  18. या वचनांद्वारे परस्परांना प्रोत्साहन द्या.