- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Backsliding बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
याकारणास्तव न्याय आमच्यापासून लांब असतो, आणि धार्मिकतेचा आम्हाला बोध मिळत नाही. आम्ही प्रकाशाची अपेक्षा करतो, पण सर्वत्र अंधकारच असतो; तेजस्वीपणाची अपेक्षा करतो, पण गडद सावलीत चालतो.
आंधळ्याप्रमाणे आम्ही भिंती लगत चाचपडत चालतो, दृष्टिहीनांप्रमाणे स्पर्शाद्वारे मार्ग चाचपडतो. मध्यान्हात आम्ही संधिप्रकाशात असल्याप्रमाणे अडखळतो; बलवानांमध्ये आम्ही मेलेल्यांसारखे असतो.
आम्ही अस्वलांसारखे गुरगुरतो; कबुतरांप्रमाणे शोकाने हुंकारतो. आम्ही न्यायाचा शोध घेतो, पण तो सापडत नाही; सुटकेसाठी धडपडतो, पण ती फार दूर गेलेली असते.
कारण तुमच्या नजरेत आमचे अनेक अपराध आहेत, आणि आमची पापेच आमच्याविरुद्ध साक्ष देतात. आमचे अपराध सतत आमच्यासह असतात आमचे हे घोर अन्याय आम्ही कबूल करतो:
याहवेहच्या विरुद्ध केलेली बंडखोरी व लबाडी, परमेश्वराकडे फिरविलेली पाठ, बंडखोरी व छळवणूकीस प्रक्षुब्ध करणे, आमच्या अंतःकरणातून प्रसवलेले निखालस असत्य.
म्हणून न्याय मागे सरला आहे, आणि नीतिमत्ता दूर उभी आहे; सत्य रस्त्यावर अडखळले आहे, प्रमाणिकपणा प्रवेश करू शकत नाही.
जरी आमची पापे आमच्याविरुद्ध साक्ष देतात, तरी हे याहवेह, तुमच्या नामाखातर तुम्ही काहीतरी करा. आम्ही तुमच्याविरुद्ध नेहमी बंडखोरी केली आहे; आम्ही तुमच्याविरुद्ध घोर पातक केले आहे!
तुम्हीच इस्राएलची आशा आहात, संकटसमयीच्या आमच्या त्रात्या, तुम्ही या देशात आमच्याशी परकेपणाने का वागता, केवळ रात्रभर मुक्काम करणार्या वाटसरूसारखे का झाला आहात?
एखाद्या विस्मित झालेल्या व्यक्तीसारखे तुम्ही का आहात? एखाद्या वाचविण्यास अशक्त योद्ध्याप्रमाणे? हे याहवेह, तुम्ही तर येथेच आमच्यामध्ये आहात, आम्ही तुमचे नाव धारण केले आहे; आमचा त्याग करू नका!
परंतु पेत्राने सर्वांच्यासमोर नकार दिला. तो म्हणाला, “तू कशाबद्दल बोलतेस हे मला समजत नाही.”
मग तो बाहेरील आवाराच्या दाराजवळ गेला, तिथे त्याला दुसर्या एका दासीने पाहिले आणि ती लोकांना म्हणाली, “हा मनुष्य नासरेथच्या येशूंबरोबर होता.”
या खेपेसही पेत्र नाकारून आणि शपथ घेऊन म्हणाला, “मी त्या मनुष्याला ओळखत नाही!”
थोड्या वेळाने जी माणसे तिथे उभी होती, ती पेत्राला म्हणाली, “तू खरोखर त्यांच्यापैकीच आहेस हे आम्हाला माहीत आहे. तुझ्या भाषा-शैलीवरून आम्ही हे सांगू शकतो.”
हे ऐकून पेत्र शाप देऊ लागला व शपथ घेऊन त्यांना म्हणू लागला, “मी त्या मनुष्याला ओळखत नाही.” तेवढ्यात कोंबडा आरवला.
अहो मूर्ख गलातीकरांनो! तुम्हाला कोणी मोहात पाडले आहे? तुमच्या डोळ्यांसमोरच येशू ख्रिस्त यांना क्रूसावर खिळण्यात आले असे स्पष्ट चित्रित केले होते.
तुमच्याकडून फक्त एकच गोष्ट समजून घेणे मला आवडेल: नियमशास्त्राप्रमाणे कार्य केल्याने तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला किंवा जे काही तुम्ही ऐकले त्यावर विश्वास ठेवल्याने?
तुम्ही इतके मूर्ख आहात काय? जे आत्म्याद्वारे सुरू केले ते तुम्ही आता दैहिकरितीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहात काय?
एकेकाळी तुम्ही परमेश्वराला परके होता आणि वाईट कृत्यामुळे मनाने त्यांचे शत्रू झाला होता.
परंतु आता त्यांनी ख्रिस्ताच्या भौतिक शरीराच्या मरणाद्वारे, तुमचा त्यांच्याशी समेट केला आहे, यासाठी की तुम्हाला त्यांच्या दृष्टीने पवित्र आणि निष्कलंक दोषरहित सादर करावे;
जर तुम्ही तुमच्या विश्वासात दृढ व त्या शुभवार्तेमधील आशेपासून तुम्ही ढळला नाही तर स्थिर राहाल. जी शुभवार्ता तुम्ही ऐकली होती आणि जिची घोषणा जाहीरपणे आकाशाखाली प्रत्येक व्यक्तीला करण्यात आली होती, मी पौल, त्या शुभवार्तेचा सेवक झालो आहे.